बीड - तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विवाहितेचे राहत्या घरातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, इतकेच नव्हे तर अत्याचारानंतर पीडितेला गावच्या चावडीत बांधून ठेवून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिला १० मार्च रोजी रात्री आपल्या पतीसोबत घरात झोपलेली असताना ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास आरोपीने घरात शिरून पीडितेचे तोंड दाबले आणि तिला उचलून गावातील नदीपात्रात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. क्रूरतेचा कळस म्हणजे, या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला गावातील चावडीत आणून बांधून ठेवले आणि तो तेथून पसार झाला.
दोन दिवस दहशतीचे सावटसकाळी शुद्धीवर आल्यावर पीडितेने मदतीसाठी याचना केली. मात्र सुरुवातीला तिला कोणाकडूनही दाद मिळाली नाही. नंतर नातेवाईकांनी तिला मुक्त करून घरी नेले. आरोपीच्या भीतीपोटी पीडितेने दोन दिवस ही घटना गुपित ठेवली होती. अखेर, धैर्य एकवटून पीडितेने आई व मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून वैभव पटेकर या व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस आणि पिंक पथक तपास करत आहेत.
व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी ताब्यातया प्रकरणाचा व्हिडिओ पिंपळनेर परिसरात व्हायरल झाला होता. याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी संशयित असलेल्या वैभव पटेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडिताही नातेवाईकांसह ठाण्यात आली. त्यांनी तक्रार देताच पटेकर याला अटक करण्यात आली.
आरोपीला अटक केली आहे. पिंपळनेर पोलिस आणि पिंक पथक याचा तपास करत आहोत.- मधुसूदन घुगे, सहायक पोलिस निरीक्षक, पिंपळनेर
Web Summary : In Beed, a minor married woman was abducted, assaulted, and chained in public. The video went viral. Police arrested the accused, Vaibhav Patekar, after the victim filed a complaint. Investigation underway.
Web Summary : बीड में एक नाबालिग विवाहिता का अपहरण कर अत्याचार किया गया और सार्वजनिक रूप से बांध दिया गया। वीडियो वायरल हो गया। पीड़िता की शिकायत के बाद पुलिस ने आरोपी वैभव पाटेकर को गिरफ्तार किया। जांच जारी है।