शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:21 IST

कृष्णा आंधळे हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे.

बीड : मागील सहा महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, कृष्णाच्या रील्स बनविल्या जातात, बॅनर्स लावले जात आहे, त्याअर्थी तो कुठेतरी त्यांच्या संपर्कात आहे. परिणामी, आमच्या परिवारासह गावाला धोका होऊ शकतो. त्यामुळे प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे यास लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

बीड येथील जिल्हा न्यायालयात १७ जून रोजी केज तालुक्यातील मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होती. त्यानिमित्त बीडमध्ये आलेले धनंजय देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. देशमुख म्हणाले की, जेल प्रशासनामध्ये गोंधळ चालू होता, त्यामुळे तेथील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आरोपींना सुविधा पुरविल्या गेल्या असून सर्वजण एकाच जागेवर आहेत. त्यातील दोघा-दोघांना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठविण्यात यावे, अशी मागणी अर्जात केलेली आहे. न्यायालयात जे काही डिजिटल पुरावे देण्यात आले आहेत, त्याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे भाष्य करतील. तीन अर्जांवर २४ जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कृष्णा आंधळे हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे. कृष्णा आंधळे व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींचे बॅनर लावले जात आहेत, रील्स तयार केल्या जात आहेत. त्यामुळे एक भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. १६ जून रोजी आंदोलन करणार होतो. परंतु शाळेचा पहिला दिवस व शेतकऱ्यांच्या पेरण्या असल्याने आंदोलन पुढे ढकलले आहे. या संदर्भाने पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाची पुढील दिशा व मागण्या त्यांना सादर करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

आता पुढील सुनावणी २४ जून रोजीसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जून रोजी बीड जिल्हा न्यायालयात होती. मात्र न्या. व्यंकटेश पाटवदकर हे रजेवर असल्यामुळे पुढील सुनावणी आता २४ जून रोजी होणार असल्याची माहिती सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.

शहरातील बॅनर्स हटवलीराष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर राकाँ नेत्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो होता. प्रसिद्धी माध्यमांनी हा मुद्दा समोर आणताच शहरातील कराड याचा फोटो असलेले बॅनर्स काढून टाकण्यात आले.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण