बोगस खरेदीखत, फेरफारचे चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:21+5:302021-03-01T04:39:21+5:30

तालुक्यातील परळी शहर व ग्रामीण भागात वाढते शहरीकरण,लोकसंख्या तसेच लोकांना जागेची पडलेली कमतरता याचा गैरफायदा घेत नागरिकांची लूट करुन ...

Order to submit bogus purchase deed, change inquiry report | बोगस खरेदीखत, फेरफारचे चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

बोगस खरेदीखत, फेरफारचे चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

googlenewsNext

तालुक्यातील परळी शहर व ग्रामीण भागात वाढते शहरीकरण,लोकसंख्या तसेच लोकांना जागेची पडलेली कमतरता याचा गैरफायदा घेत नागरिकांची लूट करुन फसवणूक करण्यात आली. दुय्यम निबंधकांच्या संगनमताने खोटे व बनावट अकृषिक आदेश व नकाशा जोडून खरेदीखत दस्त नोंदणी केले आहेत. तसेच तुकडे बंदीचा भंग करून खरेदीखत दस्त नोंदणी केले आहेत. यातून शासनाची फसवणूक करुन प्रतिबंधित जमिनीचे खरेदीखत केले. त्यामुळे जनतेची तर फसवणूक झालीच पण शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. बोगस अकृषिक आदेश व नकाशा जोडल्याचे माहीत असतानाही संबंधित गाव कामगार, तलाठ्यांनी अशा खरेदीखत दस्तांचे फेरफार घेऊन सातबारा आठ अ अभिलेख यांना नोंदी घेतल्या आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या बोगस खरेदीखत फेरफारांची चौकशी करून झालेले फेरफार रद्द करावेत तसेच बनावट अकृषिक आदेश व नकाशा बनवणाऱ्यांचे रॅकेटचा शोध घेऊन कारवाईची मागणी ॲड. परमेश्वर गित्ते यांनी केली होती.

Web Title: Order to submit bogus purchase deed, change inquiry report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.