शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केल्याने पिस्तूल रोखून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:33 AM

आष्टी : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभे राहिल्याच्या कारणावरून पाच जणांनी एका तरुणास लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून पिस्तुल दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी संजय निवृत्ती चौधरी आणि त्यांचा भाऊ ...

आष्टी : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभे राहिल्याच्या कारणावरून पाच जणांनी एका तरुणास लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून पिस्तुल दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पाच जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी संजय निवृत्ती चौधरी आणि त्यांचा भाऊ सोमवारी लग्न समारंभासाठी मिरजगावला गेले होते. लग्न आटोपून माघारी धामणगावकडे येत असताना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ते रूईनालकोल येथील स्टँडवर चहापाणी करण्यासाठी थांबले.

यावेळी एक जीप त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि गाडीतून विजय भाऊसाहेब गाढवे, सागर रावसाहेब गाढवे, योगेश दिनेश पोकळे (तिघेही रा. धामणगाव) आणि कबीर मुहंमद सय्यद, संतोष दिलीप म्हेत्रे (दोघेही रा. कडा) हे पाच जण गाडीतून खाली उतरले. ‘तू आमच्या विरोधात ग्राम पंचायत निवडणुकीला उभा राहतोस, तू आमच्या नादी लागू नकोस’ असे म्हणत त्यांनी संजय चौधरी यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले.

त्यांचा भाऊ कल्याण याने सोडविण्याचा प्रयत्न केला असत त्याला देखील मारहाण करण्यात आली. यावेळी विजय गाढवे आणि सागर गाढवे याने कंबरेचे पिस्तूल दाखवत यावेळेस वाचला आहात, यानंतर आमच्या नादी लागलात किंवा पोलिसात गेलात तर तुमच्या कुटुंबातील लोकांना गोळ्या घालून जिवे मारुत अशी धमकी दिली आणि निघून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय चौधरी यांना भावाने तातडीने कडा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असा घटनाक्रम संजय चौधरी यांनी फिर्यादीत नमूद केला आहे. सध्या संजय यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पाचही आरोपींवर आष्टी पोलीस ठाण्यात कलम ३, ३२३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकCrimeगुन्हा