शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डेपोत कचरा टाकण्यास वडारवस्तीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:48 IST

शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.

ठळक मुद्देघंटागाड्या अडविल्या : वडारवाडी वस्तीमधील रहिवाशी आक्रमक; कचरा जाळल्यानंतर प्रदूषण होत असल्याने विरोध

केज : शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. मात्र नागरिक आक्र मक झाल्याने चालकांनी गाड्या परत माघारी फिरविल्या.नगरपंचायतीने कचरा डेपोसाठी बीड रस्त्यावरील गायरान जमिनीतील दीपाली तांबे यांच्या खडी सेंटरची जागा आरक्षित केलेली आहे. या जागेच्या संरक्षण भिंतीलगत वडार समाजाची वस्ती वसलेली आहे. या वस्तीवरील नागरिकांचा कचरा टाकायला विरोध आहे.डेपोत टाकलेला कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराचे लोट आणि जळण्याचा उग्र वास वडारवस्तीत पसरू लागल्याने वातावरण दूषित होऊन प्रदूषण वाढले. त्यामुळे नागरिक आक्रमक बनले.सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. प्रगती केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली वस्तीवरील महिला आणि नागरिकांनी बुधवारी दुपारी डेपोच्या गेटवर जाऊन कचरा टाकण्यासाठी आलेल्या घंटा गाड्या आणि अग्नीशमन दलाचे वाहन अडवून कचरा टाकण्यास विरोध केला. यावेळी घंटा गाड्याच्या चालकांनी ‘तुमच्या बापाची जागा आहे का ? तुम्ही कोण घडविणार ?’ अशी हुज्जत घातली. मात्र नागरिक आक्रमक बनल्याने चालकांनी नमती बाजू घेत गाड्या परत माघारी फिरवून काढता पाय घेतला.दरम्यान, मागील आठवड्यात कचरा डेपोमध्ये पेटवून दिलेल्या कचऱ्याचा धूर वडारवस्तीतील नयना विजू पवार या बालिकेच्या पोटात गेल्याने मळमळ आणि उलट्या होऊन मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे वस्तीवरील नागरिक आक्र मक बनले आहेत. कचरा डेपोमुळे या भागातील रहिवाशांना दुर्गंध व धुळीच्या लोटाने त्रस्त व्हावे लागत होते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत होता. यामुळे शेवटी नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.डेपोत कचरा टाकणे बंद न केल्यास नागरिकांना घेऊन उपोषणास बसू, असा इशारा सामाजिक कार्यकत्या अ‍ॅड. प्रगती केंद्रे यांनी दिला आहे.

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नagitationआंदोलन