शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:18 IST

भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितले.

परळी: मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात तब्बल १ लाख ४० हजार २२४ पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला. यामुळेच मुंडे यांचे कार्यकर्ते, परळीत 'ओन्ली डीएम' असा नारा देत जल्लोष करत आहेत.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत राहिले. यामुळे शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी केली. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देखमुख यांना पक्षात घेत तिकीट दिले. यामुळे मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही लढत मराठा विरुद्ध ओबीसी  अशी झाली. दरम्यान, लोकसभेला भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा जरांगे फॅक्टर मुळे पराभव झाल्याने धनंजय मुंडे यांच्यासमोर मतांची जातीय विभागणी टाळण्याचे आव्हान होते. 

दरम्यान, भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितले. स्वतः धनंजय मुंडे यांची यंत्रणा, त्याला भाजपा आणि महायुतीच्या मित्र पक्षांची जोड मिळाल्याने परळीचा गड सहज शक्य झाला. निर्णायक आघाडी घेतलेल्यानंतर मुंडे यांनी देखील जनतेने निवडणूक हाती घेऊन विजय साकार केल्याची प्रतिक्रिया दिली.

देशमुख यांना पडली फक्त ५४ हजार मतेपरळी विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 40 हजार 224 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे उमेदवार , कृषिमंत्री धनंजय मुंडे  विजयी, प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे श्री राजेसाहेब देशमुख यांना 54 हजार 665 मते मिळाली तर धनंजय मुंडे यांना 1लाख 94 हजार 889 मध्ये मिळाली आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडे