शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:20 IST

कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देपालिकांत अंबाजोगाई आघाडीवर तर माजलगावचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कर भरणा करण्यास नागरिकांची उदासिनता असून कर वसुली करण्यास नगर पालिका व नगर पंचायतींचा आखडता हात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकांमध्ये अंबाजोगाई आघाडीवर असून माजलगावचा सर्वात नीचांक आहे. तर नगर पंचायतीत केज पहिल्या क्रमांकावर असून पाटोद्याची केवळ ४ टक्केच वसुली आहे. ही आकडेवारी पाहता प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय बनला असून कडक पाऊले उचलण्यास प्रशासन धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिक व नगर पंचायतींच्या वतीने कर वसूलीला अधिक गती देण्यात आली आहे. मागी महिनाभरापासून कर वसुलीचा टक्का वाढला असला तरी जिल्ह्याचा एकुण वसुलीचा टक्का पाहता खुपच कमी आहे. पालिकांनी कर वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त केली. शिवाय कारवायाही करण्यास सुरूवात केली. वास्वविक पाहता या कारवाया केवळ सर्वसामान्यांवर करण्यात आल्या. धनदांडग्यांना वगळण्यात आल्याने वसुलीचा टक्का वाढत नसल्याचे सूत्रांकडून समजते. कर बुडविणाऱ्यांवर धनदांडग्यांवरही सर्वसामान्यांप्रमाणेच कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सर्वांवर समान कारवाई आणि कारवाईचा धाक दाखवून वसुली केल्यास वसुलीची टक्केवारी वाढल्याशिवाय राहणार नाही, असे सांगण्यात येते.

मालमत्ता, पाणीपट्टी, रोहयो, शिक्षण कर आकारले जातात. पाणीपट्टी आणि घरपट्टीत समाधानकारक वसुली झालेली आहे. परंतु मालमत्ता कराची टक्केवारी खूपच कमी आहे. मालमत्ता कर भरण्यास नागरिकांची उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीसाठी अद्याप तरी पालिकांनी पाऊले उचलले नसल्याचे दिसून येते.सर्व वसुली करुन पालिकांचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.अशी आहे वसुली : वारंवार बैठका घेऊनही यंत्रणेचे दुर्लक्षकर वसुली करण्यात अंबाजोगाई नगर पालिका आघाडीवर आहे. अंबाजोगाईत ६९.४९ एवढी वसुली झाली असून बीड ४०, परळी ३०, गेवराई ४६, धारूर ४४, माजलगावची केवळ २४ टक्के वसुली आहे. न.पं.मध्ये केज पंचायतीने ५४ टक्के वसुली केली आहे तर आष्टी २०, शिरूरकासार १३, वडवणी ४१ टक्के एवढी वसुली आहे. पाटोद्यात मात्र केवळ चार टक्के वसुली झाल्याची नोंद जिल्हा प्रशासन विभागाकडे आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी मिलींद सावंत यांनी सर्व नगर पालिका व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाºयांच्या कर वसुलीसंदर्भात वारंवार बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. कारवाईचे आदेशही दिले. परंतु मुख्याधिकाºयांनी पहिले पाढे पंचावन्न असेच कार्य केले. त्यामुळेच वसुलीचा टक्का ३८ टक्यांवर थांबला आहे. सावंत यांच्या सूचनांकडे मुख्याधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडTaxकरMarathwadaमराठवाडाAmbajogaiअंबाजोगाई