शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बीडमध्ये केवळ १७.३० टक्के इतकेच पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:26 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सुरु असलेले कर्जमाफीचे गुºहाळ अजून संपलेले नाही. या प्रक्रियेमुळे मागील खरीप हंगामात पीक कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७.३० टक्के इतकेच पीक कर्जाचे वाटप झाले. आता आगामी हंगामाच्या दृष्टीने पीक कर्जाचे नियोजन करण्याच्या सूचना शासन स्तरावर देण्यात आल्या आहेत. परंतू कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पीक कर्जाची मागणी येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सुरु असलेले कर्जमाफीचे गुºहाळ अजून संपलेले नाही. या प्रक्रियेमुळे मागील खरीप हंगामात पीक कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७.३० टक्के इतकेच पीक कर्जाचे वाटप झाले. आता आगामी हंगामाच्या दृष्टीने पीक कर्जाचे नियोजन करण्याच्या सूचना शासन स्तरावर देण्यात आल्या आहेत. परंतू कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पीक कर्जाची मागणी येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.

मागील वर्षी बीड जिल्ह्यात राष्टÑीयकृत बॅँका, महाराष्टÑ ग्रामीण बॅँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला खरीप हंगामात १९२७ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर रबी हंगामासाठी ३४० कोटी ७२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. मात्र पीक कर्ज घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक शेतकºयांना कर्जमाफीसाठीचे सोपस्कर पार पाडावे लागले. कर्ज माफच होणार आहे. त्यानंतर बघू अशी भूमिका अनेकांनी घेतली. कर्जमाफीच्या कामांबरोबरच बॅँकांना शेतकºयांच्या पीक विमा हप्त्याचा भरणा करावा लागला. ही प्रक्रियाही कीचकट व मंदगतीने होत राहिली.मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने हजेरी लावल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्याचा शेतीला अराधार झाला. हंगामी पिकांबरोबरच भाजीपाल्याची लागवडही वाढली. यासाठी शेतकºयांना फारशी आर्थिक गरज निर्माण झाली नाही.एकदा कर्जमाफी झाली म्हणजे पुढचे पाहता येईल या विचाराने शेतकºयांनी बॅँकांकडे पीक कर्जाची मागणी केली नाही. त्याचबरोबर बॅँकाही कामाच्या व्यापामुळे शेतकºयांपर्यंत पोहचू शकल्या नाही. त्यामुळे खरीप हंगामात निर्धारित कालावधीत ३३३ कोटी ३८ लाख रुपयांचे पीककर्ज बॅँकांनी वाटप केले. तर रबी हंगामात ११४ कोटी ४३ लाख रुपये पीककर्जाचे वाटप केले आहे. येत्या हंगामात पीककर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.कर्जमाफी पूर्ण झाली तरच पीककर्ज प्रक्रियामागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी हंगामात पीककर्ज वाटप करण्याबाबत नियोजनाच्या सूचना केल्या होत्या. मागील वर्षी विशेषत्वाने कर्जमाफीच्या घोषणेमुळे पीककर्जाची मागणी पुढे येऊ शकली नाही. कर्जमाफीच्या घोषणेची पुर्णत: अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तांत्रिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या शेतकºयांना २० मेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे आधी कर्जमाफीची प्रक्रिया शासन व प्रशासन व बॅँकांना पूर्ण करावी लागणार आहे.

निरंक खातेदारांना मिळेल कर्जकर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आगामी हंगामातील पीककर्ज वाटपाची उद्दिष्टयपूर्ती सुलभ होणार आहे. तर कर्जमाफी योजनेत ज्या शेतकºयांचे खाते निरंक झाले त्यांना पीककर्ज घेता येणार आहे.

कर्जमाफी आतापर्यंतचीबीड जिल्ह्यात १४ लाख ९ हजार ९७० शेतकºयांना ७१३ कोटी ३३ लाख रुपयांची कर्जमाफी झाल्याचे व ही रक्कम कर्जखाती जमा झाल्याचे जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी सांगितले.

तरीही प्रमाण कमीच...!२७ राष्ट्रीयीकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा ग्रामीण बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये एसबीआयने खरीप हंगामात ७३५९, मराठवाडा ग्रामीण बँकेने ८९१३ व जिल्हा बँकेने ३५ हजार ८१४ शेतकºयांना पीककर्जाचे वाटप केले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा