शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक टन वजनाचे सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:09 IST

तरुणाच्या अंगावर विंड कंपनीचा एक टन वजनाचा सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुसळंब : शेतात चारण्यासाठी शेळ्या घेऊन गेलेल्या तरुणाच्या अंगावर विंड कंपनीचा एक टन वजनाचा सिमेंट ब्लॉक अंगावर पडल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली.पाटोदा तालुक्यातील चिखली येथील ऋ षिकेश दत्तात्रेय लाड याने आयटीआयचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले होतो. रविवारी तो शेळ्या चारण्यासाठी गावाजवळच दोन किमी अंतरावरील डुकर पट्टी परिसरात गेला होता.दुपारी चारच्या सुमारास सचिन लाड व शिवाजी सुरवसे यांच्यासोबत जेवण केल्यानंतर शेळ्या जवळच्या शेतात गेल्या का हे पाहण्यासाठी ऋषिकेश शोध घेत होता.वाटेत एशियन विंड मिल, चेन्नई येथील कंपनीने एक टनचे तीन ब्लॉक एकमेकांवर रचून ठेवलेले होते. ते अचानक ऋषिकेशच्या अंगावर पडल्याने त्याचा दबून मृत्यू झाला. शिवाजी सुरवसे, सचिन लाड यांना ही बाब कळताच त्यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. ३० ते ४० ग्रामस्थांनी तो सिमेंट ब्लॉक लोखंडी पहारीच्या सहाय्याने ऋषिकेशच्या अंगावरून बाजूला केला. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.ऋषिकेशच्या मृत्यूला कंपनीचे धोरण जबाबदारसदर कंपनीने पवनचक्की बनवण्यासाठी टेस्टिंग टॉवर उभे केले होते उभे करण्यासाठी सिमेंटचे मोठमोठे ब्लॉक तयार करून तारेचे ताण बांधले होते. काही दिवसांनी ते काम संपल्यानंतर तारा काढल्या. परंतु सिमेंटचे ब्लॉक तसेच एकावर एक रचलेले राहिले. याच ब्लॉकने ऋषिकेशचा बळी घेतला.काम झाल्यानंतर वेळीच ब्लॉक हलविले असते तर ही घटना घडली नसती. त्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलाचे चुलत बंधू तात्यासाहेब लाड यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू