शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीसाठी एक इंच उंची कमी; मग डोक्याला चिकटवला खिळा

By सोमनाथ खताळ | Updated: July 2, 2024 11:52 IST

बीडमधील प्रकार, उमेदवाराला भरती प्रक्रियेतून केले अपात्र

बीड :पोलिस भरतीत केवळ एक इंच उंची कमी भरत होती. मग, उमेदवाराने शक्कल लढवत चक्क डोक्याला खिळा चिकटवून उंची वाढविल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. या उमेदवाराला पोलिसांनी अपात्र ठरवत भरती प्रक्रियेतून बाहेर काढले.

बीडमध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई बँड्समॅन यांच्या १७० पदांसाठी पोलिस मुख्यालयावर १९ जूनपासून भरती सुरू आहे. बीडसह राज्यातील ८ हजार ४२९ उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले होते. १ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजताच सर्व उमेदवारांना पोलिस मुख्यालयात घेण्यात आले. त्यांची सर्व शारीरिक चाचणी केली जात होती.

बीडमधीलच एका उमेदवाराची उंची तपासली जात असताना एका कर्मचाऱ्याने डोक्याला हात लावला. त्यांना डोक्यात जाड वस्तू लागली. त्यांनी त्या उमेदवाराकडे विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जास्त केस वाढलेले असल्याने वरून काहीही समजत नव्हते. अखेर या उमेदवाराला बाजूला घेत त्याचे केस बाजूला करत तपासणी केल्यावर त्याने एक इंच उंचीचा खिळा केसांच्या आतून फेवि क्विकने चिकटवला होता. यामुळे त्याची उंची भरती योग्य होणार होती. परंतु, पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा फसवणुकीचा प्रकार अपयशी ठरला. या उमेदवाराला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर सर्व माहिती घेऊन त्याला प्रक्रियेतूनच अपात्र ठरविण्यात आले.

या अगोदर एका तरुणावर गुन्हाया अगोदरही एका तरुणाने धावण्यासाठी शक्ती वाढविणारे औषध बॅगमध्ये आणले होते. त्याच्यासोबत इंजेक्शनही सापडले होते. पोलिसांनी ते जप्त करून दोन दिवस चौकशी केली. सर्व अहवाल आल्यावर या तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडला आहे. परंतु, या प्रकरणात अपात्र ठरविले असून, गुन्हा दाखल केला नाही.

अपात्र ठरवले

एका उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी डोक्यात केसांच्या आतून खिळा चिकटवला होता. परंतु, आमच्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून हा प्रकार उघड झाला. संबंधित तरुणाला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात आले.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड