शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत राडा! जुन्या वादातून तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 20:07 IST

बरकतनगर रोडवर आज दुपारी दोन कुटुंबात अचानक वाद उफाळून आला.

परळी: शहरातील बरकतनगर रोडवर जुन्या भांडणाच्या कारणावरून जोरदार हाणामारीची घटना आज दुपारी घडली. या हाणामारीत नागापूर येथील रहिवासी शेख अलाउद्दीन यांचा मृत्यू झाला. 

कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली असल्याची  चर्चा ऐकायला मिळाली. परंतु प्रत्यक्षात मात्र तिघाजणांमध्येच भांडण झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीसअधिकारी, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व इतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. 

जुना वाद ठरला जीवघेणाबरकतनगर रोडवर आज दुपारी दोन कुटुंबात अचानक वाद उफाळून आला. वाद मारामारीपर्यंत पोहचला. यात एकाचा मृत्यू झाला. मृत अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी पानटपरी चालक आहेत. बरकतनगरमध्ये एका लग्न समारंभासाठी नागापूर येथील नातेवाईक आले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उफाळून आल्याची माहिती आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नकानागापूर येथील दोन कुटुंबात असलेल्या खाजगी कारणावरून वाद झाला. याचा आणि लग्नाचा किंवा दोन गटाचा कसलाही संबंध नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, संभाजीनगरपोलीस स्टेशन, परळी वैजनाथ

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी