एक मृत्यू, ३६ नवे रुग्ण, तर २५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST2021-01-01T04:22:55+5:302021-01-01T04:22:55+5:30

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाचे मृत्युसत्र पुन्हा सुरू झाले आहे. गुरुवारी टाकळसिंग (ता. आष्टी) येथील ३५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची ...

One death, 36 new patients, 25 free corona | एक मृत्यू, ३६ नवे रुग्ण, तर २५ कोरोनामुक्त

एक मृत्यू, ३६ नवे रुग्ण, तर २५ कोरोनामुक्त

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाचे मृत्युसत्र पुन्हा सुरू झाले आहे. गुरुवारी टाकळसिंग (ता. आष्टी) येथील ३५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली, तर ३६ नवे रुग्ण निष्पन्न झाले. शिवाय २५ जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गुरुवारच्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ७, आष्टी २, बीड १२, गेवराई ३ केज ५, परळी ८ तर पाटोदा तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. अन्य पाच तालुक्यांत गुरुवारी एकही नवा रुग्ण निष्पन्न झाला नाही. आता एकूण बधितांचा आकडा १६ हजार ७८३ इतका झाला असून पैकी १५ हजार ९६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे, ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Web Title: One death, 36 new patients, 25 free corona