शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:56 IST

Jaldut Rajesh Kakade Beed: बीडच्या जलदुताचा निर्धार! ग्रामस्थांना पाण्यासाठी एक बोअरवेल कमी पडला, लगेच पत्नीचे दागिने विकून दूसरा घेतला

- सोमनाथ खताळ

बीड : सामाजिक बांधिलकी जाेपासत बीड तालुक्यातील जरूड येथील राजेश रामचंद्र काकडे हे छोट्या-मोठ्या पाच गावांना मोफत पाणी पुरवठा करत आहेत. एका बोअरवर ताण येत असल्याने दुसरा बोअर घेतला. परंतू त्याला खर्च येत असल्याने त्यांनी पत्नी पुजा हिच्या अंगावरील दागिने विकले. काकडे यांची 'जलदूत' म्हणून ओळख झाली आहे.

राजेश कराड यांना तीन एकर जमिन. त्यात डाळींबाचे ३०० झाडे, एक एकर ऊस आणि बाजरीचे पीक घेतले. २०१४ पासून ते गावात पाणी पुरवठा करत होते. परंतू २०२४ मध्ये पाण्याची मागणी वाढल्याने काही लोकांना पाणी देता येत नसल्याने ते चिंतेत होते. दुसरा बोअर आणि मोटार बसविण्यासाठी साधारण दीड लाख रूपये खर्च येत होता. परिस्थिती हालाकिची असल्याने त्यांनी पत्नी पुजा यांच्या अंगावरील दागिने (नेकलेस व झुंबर) विक्री केले. याच पैशातून बोअर घेतला आणि त्याला पाणीही भरपूर लागले. प्रत्येक उन्हाळ्यात ते शेतात कसलेही पीक न घेता पाणी वाटप करतात. २०२४ मध्ये त्यांनी ऊस व बाग मोडून मोफत पाणी पुरवठा कला.

रोज २० हजार लिटर पाणी वाटपलाईट आली की दोन्ही बोअर सुरू केले जातात. २४ तासांत साधारण २० हजार लिटर पाणी वाटप केले जाते. तसेच २ हजार लिटरच्या ८ टाक्या असून त्या कायम स्टॉक म्हणून वापरल्या जातात. लाईट गेली की लोक टाकीतील पाणी नेतात.

तलावातील पाणी नकोजरूड गावाला तलावातून पाणी पुरवठा होतो. योजनाही कार्यान्वित आहे. परंतू पाणी पिण्यायोग्य नसल्याने लोक काकडे यांच्याच बोअरने तहान भागवतात. जरूडसह शिवणी फाटा, बाभूळखुट्टा, खुट्टेवाडी, शिवणी फाटा आदी ठिकाणी सध्या पाणी पुरवठा होत आहे.

कार्यक्रम असल्यास घरपोच सेवाया गावांमध्ये कोणाचाही सुख-दु:खाचा कार्यक्रम असला की राजेश काकडे घर पोहच पाणी पुरवठा करतात. यासाठी ट्रॅक्टर संबंधितांकडून घेतले जाते. यात्रेतही जे व्यावसायिक बाहेर गावाहतून येतात, त्यांना जागेवर पाणी वाटप केले जाते.

२०१४ साली दुष्काळ पडला आणि लोकांचे हाल पहावेले नाहीत. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. २०२४ साली पत्नीचे दागिने विक्री करून बोअर घेतला. आज सर्वांना मोफत पाणी वाटप करतो, याचा आनंद वाटतो.- राजेश काकडे, जलदूत, जरूड, ता.बीड

टॅग्स :WaterपाणीBeedबीडMarathwadaमराठवाडा