शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या वाटेवरील उसतोड मजुरांचा ट्रॅक्टर उलटला; चाऱ्याखाली दबल्याने एकाचा मृत्यू, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:23 IST

पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंपरी घाटा येथील उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला.

कडा ( बीड) :  बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखान्यासाठी उसतोडणी करून गावाकडे परतणाऱ्या मजुरांचे ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात एक मजूर जागीच ठार झाला. तर अन्य पाचजण मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास पिंपरी घाटा येथील उतारावर झाला. बाबासाहेब ज्ञानदेव शेकडे ( रा.म्हसोबावाडी, ५५ ) असे मृत मजुराचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील मजुर दरवर्षी ऊसतोडणीसाठी जातात. यंदाच्या वर्षी ते बारामती अॅग्रो येथील सहकारी साखर कारखान्यावर उसतोडणीसाठी सहा महिन्यांपूर्वी गेले होते. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने सर्व मजूर गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावाकडे ट्रॅक्टरमधून ( क्रमांक एम.एच २३,ए.जी. १२९२) निघाले होते. 

दरम्यान, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंपरी घाटा येथील उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात बाबासाहेब ज्ञानदेव शेकडे (  ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हिराबाई बाबासाहेब शेकडे, योगेश बाबासाहेब शेकडे, आप्पासाहेब ज्ञानदेव गिते, कविता आप्पासाहेब गिते, नामदेव बाबुराव शेकडे ( सर्व रा.म्हसोबावाडी ता.आष्टी ) हे पाचजण जखमी झाले. जखमींवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तरूणांच्या मदतीमुळे वाचले प्राण अपघाताची माहिती मिळताच प्रा.भागचंद झांजे, भरत झांजे, सोमीनाथ घुमरे, सदाशिव घुमरे, गणपत घुमरे, अरूण घुमरे, बिबीशन घुमरे, कैलास घुमरे, अंगद झांजे, अमोल तळेकर, महादेव घुमरे, संजय घुमरे यांच्यासह ग्रामस्थांनी उसाखाली दबलेले मजुर बाहेर काढले. जखमींना वेळीच मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.  तरूणांच्या मदतीने पाच जीव वाचले..

वाचवा, आम्हाला बाहेर काढा जनावरांसाठी चारा, निवाराचे साहित्य घेऊन टॅक्टर निघाला होता. पहाटे अचानक टॅक्टर उलटल्याने मोठा आवाज झाला. वाचवा, अशी तेव्हा वाचवण्यासाठी मजुरांचा आरडाओरड सुरू होता. घटनास्थळी वाचवा, आम्हाला बाहेर काढा या वेदनेने व्याकुळ झालेल्या मजुरांचा टाहो कानावर येत होता.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूAccidentअपघात