शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्केची मंजूरी असूनही मिळते ५० टक्केच शिष्यवृत्ती, भेदभाव का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:44 IST

२००३ मध्ये शंभर टक्के शिष्यवृत्तीचा झाला होता निर्णय

बीड : ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात २००३ मध्ये सरकारने निर्णय घेतला; परंतु व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ओबीसीच्या मुलांना ५० टक्के शिष्यवृत्ती दिली जात आहे. अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२००३ मध्ये माजी मंत्री तथा ओबीसी नेते सुधाकर गणगणे यांच्या नेतृत्वाखाली ११ जणांचे शिष्टमंडळ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटले व ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर मुख्यमंत्री देशमुख यांनी २००३ ला नवीन कायदा तयार करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात निर्णय घेत बजेटमध्ये आर्थिक तरतूद करून तत्काळ अंमलबजावणीबाबत आदेश पारित केले होते.

केंद्र सरकार सर्वच एससी, एसटी, ओबीसीच्या मुलांना १०० टक्के शिष्यवृत्ती योजना राबवत आहे, पण राज्य सरकारकडून व्यावसायिक शिक्षणासाठी ५० टक्केच ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती का ? हा खरा प्रश्न आहे. तत्काळ शासन स्तरावर चौकशी समिती नेमून त्वरित ‘खास बाब’ म्हणून १०० टक्के सर्व ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायव्यावसायिक शिक्षण संस्थेकडून आस्थापना कर्मचारी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क वसूल ५०% विद्यार्थ्यांकडून वसूल करतात. हा निर्णय ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसीच्या सर्व मुलांसाठी कायद्यानुसार शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याची योजना लागू करण्याची मागणी मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अर्थसंकल्पात भरीव तरतूद, पण शिष्यवृत्तीचे कायमहाराष्ट्रात सर्वच मागासवर्गीय विभागांसाठी विविध योजना राबविण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या त्रिमूर्ती सरकारने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली, पण अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. मग ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते, असा भेदभाव का ? असा आरोपही वसंत मुंडे यांनी केला.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती