शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:13 IST

नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देबीडमध्ये समता मेळावा : छगन भुजबळ यांची सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरकारच्या विरोधात बोललं तर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखी हत्या केली जाते. मेक इन इंडियाचा बाऊ सरकारने केला आहे. दहशतवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदींनी नोटबंदी केली होती. मात्र, यातील एकही गोष्ट साध्य झाली नाही. परंतु नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.बीड येथे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित समता मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, खा. समीर भुजबळ, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ. सतीश चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडीत, आ. रामराव वडकुते, बापूसाहेब भुजबळ, आयोजक सुभाष राऊत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, राजेंद्र जगताप, रवींद्र क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, पार्वती सिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले, बीडमध्ये आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पक्ष व पदाचा विचार न करता ते समतेच्या मागे उभे राहिले. ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावत लढलो. याच बीडमधून आपण समता पर्वाची सुरुवात पुन्हा एकदा करीत असल्याचे ते म्हणाले.जयदत्त क्षीरसागर : पवारांच्या सभेला हजर रहाभुजबळांच्या नवीन पर्वाचा शुभारंभ बीडपासून होत आहे. त्यांनी संघर्षातूनही आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. हा तुरुंगवास हा सहन करावा लागला ? ज्या महाराष्ट्र सदनावरुन भुजबळांना आत जावे लागले त्यामध्ये बसून अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बैठका घेतात. महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर असल्याच्या वलग्ना देखील त्यांच्याकडून केल्या जातात. मग भुजबळांना ही शिक्षा का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज असून, सामान्यांना आधार देण्यासाठी ज्योती-क्रांतीच्या विचाराकडे आपल्याला जावे लागेल असे ते म्हणाले. शरद पवार यांची १ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये सभा होत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.२०१९ नंतर पुन्हानिवडणूक होणार नाही- धनंजय मुंडेमेळाव्यादरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा हे सरकार निवडून आले तर लोकशाहीला घातक आहे.पुढे निवडणुकाच घेतल्या जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे एकत्रित येऊन या जातीयवादी सरकारविरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.शेतकरी अडचणीतराज्यात शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना देखील तीन हजार भरा, नसता रोहित्र बंद करु असे सांगितले जाते. या दुष्काळाच्या परिस्थितीत पैसे कोठून भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यात ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बलात्कार होतो. शासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. पुढील काळात दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार आहे. परंतु सरकारकडून मात्र सर्वांच्याच आशेवर पाणी फेरण्याचे काम केले जात असल्याची टीका भुजबळ यांनी केली.कार्यकर्त्यांचा गोंधळमेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख नेते व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांच्या एका गटाने जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी बॅरीकेटस् तोडले. त्यानंतर क्षीरसागरांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत बसले.

टॅग्स :BeedबीडChagan Bhujbalछगन भुजबळ