शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची संख्या आठवर, अद्यापही कृष्णा आंधळे मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:46 IST

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : सरपंच संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी

केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याच्यासह देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या तिसऱ्या आरोपीला शुक्रवारी रात्री बीड पोलिसांनी बेड्या ठाेकल्या. दोघे पुण्यातून तर एकाला कल्याणमधून अटक केली. आता या प्रकरणात आरोपींची संख्या आठ झाली असून, अजूनही कृष्णा आंधळे मोकाटच आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आतापर्यंत सात आरोपी होते. त्यातील चौघे अटकेत होते. परंतु सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीनही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर त्यातील घुले व सांगळे यांना शनिवारी पहाटे पकडण्यात यश आले आहे. आंधळे अजूनही फरार आहे, तर दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी झाला आहे. एकूण अटक आरोपींची संख्या सात झाली आहे.

डॉक्टरकडून मिळाले आरोपींचे लोकेशनसुदर्शन घुले व इतरांना आर्थिक मदत पुरविल्याचा व आरोपीशी भ्रमणध्वनीवरून संपर्कात असल्याचा ठपका ठेवून केज येथील डॉ. संभाजी वायबसे यांना एसआयटी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नांदेडमधून ताब्यात घेतले होते. त्यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी आणले होते. त्यांची केज येथील शासकीय विश्रामगृहात दोन तास व पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशी केल्यानंतर फरार आरोपींचे लोकेशन मिळाले. त्यावरून पुण्यातील बालेवाडी स्टेडियम परिसरातील एका खोलीतून घुले व सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतले. आता डॉ. संभाजी वायबसे यांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

दोनवेळा वैद्यकीय तपासणीपुणे येथून तिन्ही आरोपींना शनिवारी सकाळी जिल्ह्यात आणले. केजला नेण्यापूर्वी त्यांची नेकनूर स्त्री रुग्णालयात सकाळी १० वाजता डॉ. यमपुरे यांनी वैद्यकीय तपासणी केली. नंतर नेकनूर पोलिस ठाण्यात जबाब घेतले. तेथून केजला आणल्यावर उपजिल्हा रुग्णालयात दुपारी ४.४५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी तपासणी केली.

सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपीमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रथमत: सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचा समावेश झाला. आता घुले याला सरपंच देशमुख यांचे लोकेशन दिल्याच्या आरोपावरून मस्साजोग येथील रहिवासी सिद्धार्थ सोनवणे यालाही सीआयडीच्या पथकाने आठवा आरोपी केले.

तिघांनाही १५ दिवसांची पोलिस कोठडीघुले, सांगळे आणि सोनवणे या तिनही आरोपींना शनिवारी दुपारी ३ वाजता केज येथील न्यायालयात हजर केले. न्या. पावसकर यांनी तिघांनाही १५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर आरोपीच्या वतीने ॲड. ए. व्ही. तिडके यांनी काम पहिले. दुपारी ४.४५ वाजता या तिघांनाही पोलिस वाहनातून बंदोबस्तात बीडला नेण्यात आले. यावेळी पोलिसांचा न्यायालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी