शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वाढीव जनावरे दाखवणाऱ्या बीड जिल्ह्यातील छावण्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:52 PM

जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती.

ठळक मुद्दे१८ चारा छावण्यांचा समावेश : दंडात्मक कारवाईसह फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता; देयके रखडणार

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती. त्यानंतर कारवाई होण्याच्या भितीने पुढील दोन दिवसात बहुतांश चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या घटल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून १२ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले व कारवाई करत खाबूगिरी करणाºया १८ चारा छावण्यांना प्रशासनाने नोटीस दिली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असून गुन्हे दाखल होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.चारा छावण्यांतून शासनाला दररोज अंदाजे १२ लाखांचा चूना या मथळ््याखाली १२ मे रोजी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. ९ मे रोजी प्रशासनाकडून अचानक चारा छावण्याची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर ७४४ जनावरे जास्त दाखवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे छावणी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती. तसेच दोन तलाठी देखील निलंबित करण्यात आले होते.या प्रकरणानंतर कारवाई होण्याच्या भितीने १० मे रोजी दिलेल्या दैनंदिन अहवालामध्ये जिल्ह्यातील चारा छावण्यावरील जनावरांची संख्या १७ हजार ९१ एवढी घटली होती. म्हणजे कारवाई करण्यापुर्वी ही जनावरे अधिक दाखवून मलिदा खाण्याचा प्रयत्न काही छावणी चालकांकडून करण्यात येत होता. तसेच ज्या गावांमध्ये कारवाईची नोटीस देण्यात आली आहे, त्या ठिकाणी गैरप्रकार करणा-या संस्था त्याच-त्याच दिसून येत आहेत. त्यांना राजकीय पाठबळाची चर्चा आहे.प्रशासनाने उधळला छावणी टोळीचा डावजिल्हा प्रशासनाच्या वतीने चारा छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आल्यामुळे जास्तीची जनावरे दाखवून भ्रष्टाचार करणाºया छावणी टोळीचा डाव प्रशासनाने उधळून लावला आहे.या चारा छावण्या राजकीय पक्षांशी संबंधीत असलेल्या नेत्याच्या असल्यामुळे कारवाई होऊ नये यासाठी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.काही संस्थांचा सेवाभाव संपला, गुन्हे दाखल करासेवाभाव वृत्तीमधून छावणी चालवणाºयांतर्फे देखील अनेक चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.मात्र, काही संस्थांचा सेवाभाव संपला असून काही प्रशासकीय यंत्रणेलाच हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. त्यामुळे अशा संस्थांची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र