शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
4
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
5
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
6
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
7
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
8
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
9
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
10
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
12
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
13
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
14
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
15
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
16
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
17
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
18
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
19
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
20
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

ऊसतोडणी कारणीभूत नव्हे; सुविधांच्या अभावामुळेच काढल्या गर्भपिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:08 IST

बीड जिल्ह्यात ऊसतोडणीला जाण्यासाठी महिला गर्भपिशव्या काढत असल्याची माहिती समोर आली होती.

ठळक मुद्दे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अभ्यास समितीने ३२ शिफारशी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत

- सोमनाथ खताळ 

बीड : ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणाला ऊसतोडणी नव्हे तर सुविधांचा अभाव कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. साखर कारखान्यांकडून जादा काम करून घेणे, साखर आयुक्त आणि कामगार विभागाने त्याकडे दुर्लक्ष करणे हेच यास जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभाग, साखर आयुक्त, कामगार आयुक्त, महिला व बालकल्याण, पुरवठा विभागाशी निगडित विविध अशा ३२ शिफारशी समितीने आरोग्य मंत्र्यांसमोर सादर केल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

बीड जिल्ह्यात ऊसतोडणीला जाण्यासाठी महिला गर्भपिशव्या काढत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर याच्या चौकशीसाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०१९ रोजी समिती नियूक्त केली. या समितीने दोन महिने अभ्यास करून उसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या का काढल्या, याच्या कारणांसहित त्यांना काय सुविधा देणे अपेक्षित आहे, याच्या शिफारशी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. 

यामध्ये साखर कारखाने व आयुक्त, कामगार आयुक्त, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, पुरवठा विभागाशी संबंधित सर्व ३२ शिफारशी आणि काही सूचना करण्यात आल्या आहेत.दरम्यान, कारखान्याला गेल्यावर महिलांकडून जादा काम करून घेतले. त्या ठिकाणी अस्वच्छता, वेळेवर जेवण नसणे, राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव, स्नानव्यवस्था इ. किरकोळ परंतु त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध आजारांची लागण होते. यामुळेच मग त्यांना गर्भपिशवी शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.१३ हजार गर्भपिशवी शस्त्रक्रिया समितीच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी जिल्ह्यातील ८२ हजार ३०९ महिलांचे सर्वेक्षण केले. पैकी १३ हजार ८६१ महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया काढल्याचे समोर आले आहे. याच्या कारणांसह अहवाल आरोग्य मंत्र्यांना सादर केलेला आहे. 

‘त्या’ रुग्णालयांवर होणार कारवाई?गर्भपिशवी शस्त्रक्रिया करायची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या परवानगीसह मार्गदर्शक सूचना बंधनकारक केलेल्या आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी महिलांच्या मनात भीती घालून आणि गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्यांची चौकशी सुरूच आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. १३ हजारपैकी निम्म्याहून आधिक शस्त्रक्रिया या केवळ १० खाजगी रुग्णालयांमध्ये झालेल्या आहेत. 

या कारणांमुळे झाल्या शस्त्रक्रिया

१३ हजार ८६१ पैकी ५ हजार ६६९ शस्त्रक्रिया या अतिरक्त स्त्रावामुळे करण्यात आल्या. त्यानंतर पोटात दुखणे - ३१८७, पांढरे जाणे - २०२४, गर्भपिशवीला गाठ होणे - १००४, जंतूसंसर्ग- ७७७, अ‍ॅडिनोमायसिस - ३०१, अंग बाहेर पडणे - २५२, गर्भपिशवीच्या मुखाला सूज येणे - २०४, गर्भपिशवीच्या अस्राला सूज येणे - ७२, गर्भपिशवी मोठी होणे - २६, गर्भपिशवीचा कर्करोग - २१, अतिरक्तस्त्रामुळे प्रसूतीवेळी गर्भपिशवी काढणे - २१, अंडाशयाला गाठ येणे - १८, पू तयार होणे - १५, गर्भपिशवी मुखाचा कर्करोग - ६, अंडाशयाचा कर्करोग - १, इतर कारणे - २६३ अशा कारणांमुळे शस्त्रक्रिया झाल्याचा अहवाल आहे.

वयोमानानुसार शस्त्रक्रिया२५ वर्षांपर्यंत    ५८८२६-३०        २१३१३१-३५        ३०३४३६-४०        ३३२३४१-५०        ३७५३५१-६०        ८२५६१ वर्षानंतर        २०७एकूण        १३८६१

तालुकानिहाय शस्त्रक्रियातालुका    शस्त्रक्रिया    सर्वेक्षणगेवराई    २९९८    १६९६५शिरुर    २९१९    ९३८८बीड    १६३९    ८७७७केज    १२६४    ७२५८धारुर    ११५९    ७४४९वडवणी    ९९३    ५१८८माजलगाव    ७७५    ८२५२परळी    ७३२    ५७१९आष्टी    ६८७    ४४५७पाटोदा    ३७०    ५४३३अंबाजोगाई    ३२५    ३४२३एकूण    १३८६१    ८२३०९

टॅग्स :WomenमहिलाBeedबीडSugar factoryसाखर कारखानेHealthआरोग्य