शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

कॉफी शॉप नव्हे अत्याचाराचा अड्डा; ३०० रुपयांत तासभर केबीन, अल्पवयीनवर अत्याचार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 15:56 IST

बीडमधील प्रकार : गेवराईच्या अल्पवयीन मुलीवर बीडमध्ये आणून कॉफी शॉपमध्ये अत्याचार

- सोमनाथ खताळबीड : तरुणाई प्रेमापोटी एकमेकांना कॉफी, चहा पाजतात. याची वाढती मागणी पाहून शहरात गल्लोगल्ली कॉफी शॉप तयार झाले; परंतु काही शॉप हे आंबट चाळे करणाऱ्यांसह अत्याचाराचा अड्डा बनल्याचे समोर आले आहे. गेवराईमधील एका अल्पवयीन मुलीवर बीडमधील कॉफी शॉपमध्ये आणून अत्याचार केल्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडिता सध्या साडेआठ महिन्यांची गर्भवती आहे. विशेष म्हणजे कॉफी शॉपमधील ३ बाय ४ च्या केबीनसाठी एका तासाभरासाठी ३०० रुपये दर आकारल्याचे समोर आले आहे.

पीडित मुलगी ही १६ वर्षांची असून, अंबड तालुक्यातील रहिवासी आहे. गेवराई येथे ती चुलतीसोबत कपडे खरेदीसाठी आली होती. एवढ्यात चुलतीच्या मोबाइलमध्ये रिचार्ज करण्यासाठी गेली असता तिला रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहान लतीफ (रा. कुक्कडगाव, ता. गेवराई) या दोघांनी तोंडाला रुमाल बांधून बीडला आणले. येथील एका कॉफी शॉपमध्ये ३०० रुपये दराने तासाभरासाठी ३ बाय ४ आकाराची केबीन घेतली. याच ठिकाणी तिच्यावर रोहितने तीन वेळा अत्याचार केला. ही बाब मुलगी गर्भवती राहिल्याने समोर आली. याप्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. बुधवारी गेवराई पोलिसांनी बीडमधील कॉफी शॉप व घटनास्थळाचा पंचनामा करून काही पुरावेही जप्त केले आहेत. यावेळी गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड, बीडचे संतोष वाळके यांच्यासह महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण, युवा सेनेचे विस्तारक विपुल पिंगळे आदींची उपस्थिती होती.

महिला आयोगाचा पीडितेला आधारमहिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांना हा प्रकार समजताच त्यांनी पीडितेची भेट घेत आधार दिला. त्यानंतर पोलिसांशी चर्चा करून तत्काळ कारवाई करण्याबाबत सांगितले. कॉफी शॉपलाही भेट देऊन सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी विशेष पथक तयार करावे. सर्व कॉफी शॉपची तपासणी करावी, असेही ॲड. चव्हाण यांनी सांगितले.

युवा सेनेची उपसभापतींकडे तक्रारया प्रकरणाचा तपास लवकर करावा. कॉफी शॉप चालकालाही सहआरोपी करावे, पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद करावा, याबाबतचे निवेदन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बुधवारी पाठविले आहे. यावर युवा सेना विस्तारक विपुल पिंगळे, जिल्हा युवा अधिकारी सागर बहिर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

१० खुर्च्या अन् एक केबीनज्या कॉफी शॉपमध्ये अत्याचार झाला, त्यात एकही कॉफी नव्हती. केवळ सिगारेट ओढून टाकलेली होती. तसेच १० खुर्च्यांची व्यवस्था होती. आईसक्रीमचे फ्रीज मोकळेच होते. दरवाजाच्याही बाहेर परंतु आतून जाता येईल असा एक दरवाजा असलेली ३ बाय ४ ची केबीन आहे. या केबीनमध्येच सर्व आंबट चाळे होतात. प्रति तासाला ३०० रुपये शुल्क असते. या केबीनसाठी आंबट चाळे करणाऱ्यांची वेटिंग असते, असेही सांगण्यात आले. ही केबीन पायऱ्याच्या खाली तयार केली आहे.

वर मेडिकल अन् बाजूला फोटोग्राफीहे कॉफी शॉप तळमजल्यात होते. बाजूला फोटोग्राफीचे दुकान आहे. वरच्या मजल्यावर मेडिकल आहे. येथून निरोधचे पॉकेट घेऊन आंबट शौकीन केबीनमध्ये जातात, असेही सांगण्यात आले. याच केबीनमध्ये काही वापरलेले निरोधही सापडले आहेत. गेवराई पोलिसांनी ते जप्तही केले आहेत. तसेच बाजूला दोन मोठे हॉस्पिटल, अभ्यासिका, हॉटेलही आहेत. या परिसरात तरुणांची कायम वर्दळ असते.

कॉफी शॉपमध्ये विशेष केबीनची व्यवस्थाकॉफी शॉपमध्ये सर्रासपणे तरुणाई आंबट चाळे करत असल्याचे दिसून येते. गेवराईच्या घटनेने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हे केवळ एकच शॉप नसून शहराच्या अनेक भागात असे शॉप आहेत. यामध्ये अंधुक प्रकाश आणि विशेष केबीनची व्यवस्था केली जाते. अवघ्या तासाभरासाठी ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे. या सर्वांची तपासणी करून गैरप्रकार थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

८ मे २०१९ लाही पकडले अर्धनग्नावस्थेतील जोडपेबीड शहरातील पांगरी रोडवरील एका क्लासेसच्या बाजूलाच एक कॉफी शाॅप आहे. त्या ठिकाणी आंबट चाळे होत असल्याचा प्रकार तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांना समजला होता. त्यांनी विशेष पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे यांच्या टीमसह रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला होता. यावेळी एका केबिनमध्ये जोडपे अर्धनग्नावस्थेत पकडले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात कारवाईही झाली होती. मुलांच्या नातेवाइकांनाही बोलावण्यात आले होते. हा प्रकार ८ मे २०१९ रोजीचा आहे. त्यानंतर महिनाभर कॉफी शॉप शांत झाले. परंतु आता पुन्हा तेच प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांनीही आपल्या ठाणे हद्दीत काय गैरप्रकार चालू आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावर कारवाईही करावी, अशी मागणी होत आहे.

दामिनी पथक होणार पुन्हा सक्रियछेडछाड, रोडरोमिओंपासून मुलींना होणार त्रास कमी करण्यासाठी दामिनी पथक तयार केले होते. परंतु हे पथक सध्या सुस्त असल्याने गैरप्रकार वाढले आहेत. याच मुद्द्याला धरून ॲड. संगीता चव्हाण यांनी पोलिसांना हे पथक तात्काळ सक्रिय करण्याच्या सूचना केल्या. यावर उपअधीक्षक वाळके व राठोड यांनी गुरुवारपासून सर्व पथके सक्रिय करू, असे सांगितले.

पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी ही घटना अतिशय निंदनीय आहे. यात अत्याचार करणारा जेवढा दोषी आहे, तेवढाच कॉफी शॉप चालकही आहे. त्यालाही सहआरोपी करावे. तसेच जिल्ह्यात रोज अत्याचार, चोरी, खून असे प्रकार घडत असल्याने पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न आहे. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा मुख्यमंत्री व गृह मंत्र्यांविरोधात आंदोलन छेडू.विपूल पिंगळे, युवा सेना राज्य विस्तारक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड