शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

"पोलीस खात्यात बिगर पैशाचा कोणीच जगू शकत नाही !", दोन पोलिसांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 18:58 IST

लाचेचे पैसे देण्या-घेण्याची सखाराम सारूक आणि परमेश्वर सानप या दोन पोलिसांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली

ठळक मुद्देबीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी निलंबितस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचा उल्लेख

बीड : बिगर पैशाचा पोलीस खात्यात कोणीच जगू शकत नाही, हा संवाद आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा. ही आॅडिओ क्लिप व्हायरल होताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी परमेश्वर सानप व गणेश हंगे या दोघांना मंगळवारी निलंबित केले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारींची चर्चा या क्लिपमुळे पुन्हा जोर धरली आहे. 

लाचेचे पैसे देण्या-घेण्याची सखाराम सारूक आणि परमेश्वर सानप या दोन पोलिसांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रतिबंधात्मक कारवाई विभागात दोघांचीही ड्यूटी.  कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी किती पैसे लागतात, यासंदर्भात या दोघांमध्ये झालेला हा संवाद आहे. या क्लिपमध्ये स्थागुशाचे कर्मचारी रामदास तांदळे यांच्या आरोपी असलेल्या पाहुण्याच्या संदर्भात हे दोघे संवाद करत आहेत. ही क्लीप व्हायरल होताच या संवादातील सानप व त्याचा सहकारी हंगे यास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तीन दिवसांपूर्वीच नियंत्रण कक्षात हलविले होते. निलंबनाची कारवाई केली असली तरी, क्लिपचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याचीदेखील सखोल चौकशी होणार असल्याचे पोद्दार यांनी सांगितले. 

ऑडिओ क्लिपमधील संपादित संवाद (त्यांच्याच शब्दांत) : 

सखाराम सारुक : तांदळ्याचे मेव्हणे जीवन सानप आलेत का तिथं?परमेश्वर सानप :  मला नाही माहिती, जेलमधून सुटलेले बरेच लोकं हायत इथं.सारुक : त्यांना ५ हजार रुपये कोणी मागितले? सानप  : पोलिसांनी मागितले असतील, मला नाही माहिती.सारुक : सकाळी तर म्हणाले ना जेलचे आरोपीकडून एक रुपयापण घेत नाही.सानप : कोण म्हणालं, सांगितले पीआयने घ्यायला.सारुक : बावीच्या पाहुण्यांचे कोणी घेतले ८ हजार. सानप : पीआय साहेबांनी घेतले, फोन लाव ना पीआयला. सारुक : तुम्हाला म्हणलं तांदळ्याचा फोन येतोय तेवढं करा .सानप :  ऐकून घे, इथं २० आरोपीत बाहेर उभे. मला अजून माहिती नाही कोणय ते. तू सांगायला १०८ जेलचे आरोपी सुटले, कुठं तक्रार करायची तर करं. धमक असंल तर बोलना पीआयला.सारुक : माझा पाव्हणा नाही, तांदळ्याचा पाव्हणा आहे.सानप : तांदळे, काय एलसीबीला नेमणुकीला नाही का? सारुक : ते गावाकडे हाय सद्या. त्यामुळं मी बोललोसानप : अरे बाबा कुठंबी असला तरी, एक फोन लावायचा. जेलचा एक आरोपी माझा पाहुणाय, त्याला थोडी मदत करा, असं साहेबाला बोलायचं. घेतले पैसे तर काय फरक पडतो? पोलिसाचं कामंचय सारुक : पोलिसाचं काम हे १०० टक्के खरंय. बिगर पैशाचा पोलीस खात्यात कोणीच राहू शकत नाही. पैसा सगळ्यालाच प्यारा आहे. काही अडचण नाही मी तांदळेला सांगतो बुवा. माझ्या घरून ५ हजार घेऊन जा आणि कदमला दे. विषय संपला.सानप : काय सांगायचं ते सांग, मला टेकीचं बोलू नको, तुझ्या घरून घेऊन जा नाही तर व्याजानं काढ.सारुक : त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून घरून घेऊन जा म्हणून सांगतो. वाकडं काय बोललो?सानप : अरे बाबा तुझ्या घरात लय पैसेत ना तर रस्त्यावर टाक. सारुक : त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणूनच बोलतोय. सानप : इतकं लांब का जातोय? साहेबांना जा बोल सगळं, पाहुणाय ना?  

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचा उल्लेखप्रतिबंधात्मक कारवाईसाठीदेखील पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. आता व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक यांनीच जेलमधील आरोपीचे पैसे घेण्यास सांगितले आहे, असा उल्लेख आहे. त्यामुळे हा विषय जिल्ह्यात पुन्हा चर्चेला आला आहे. 

दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती पुढील कार्यवाही केली जाईल.- हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक बीड 

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीडCorruptionभ्रष्टाचारMONEYपैसा