शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

डोहात बुडणाऱ्या पाच वर्षांच्या सैलूसाठी नऊ वर्षांचा संविधान ठरला प्राणदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:52 IST

नऊ वर्षांच्या संविधानने वाचवले डोहात बुडणाऱ्या पाच वर्षांच्या सैलूचे प्राण

ठळक मुद्देवाचवले डोहात बुडणाऱ्या पाच वर्षांच्या सैलूचे प्राणखेळताना पडल्याने डोहात खात होती गटांगळ्या

- संतोष स्वामी

दिंद्रूड (जि. बीड) : ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे वीस फूट खोल डोहात गटांगळ्या खाणाऱ्या पाच वर्षीय सैलू या मुलीस नऊ वर्षांच्या संविधानने पाण्यात उडी घेऊन वाचविले. धारु र तालुक्यातील चाटगाव परिसरात २५ जानेवारी रोजी ही घटना घडली. हे गाव आडवळणाला असल्यामुळे ही घटना १५ दिवसांनंतर समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतरही ना संविधानच्या शाळेने दखल घेतली ना की गावकऱ्यांनी, अशी खंत त्याच्या आई-वडिलांची व्यक्त केली.

चाटगाव शिवारात परळी-बीड-अहमदनगर रेल्वे लोहमार्गाचे काम सुरू असून या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदून मार्गाचे लेव्हल करण्यात आलेले आहे. अवकाळी पावसामुळे या खड्ड्यात २० ते २५ फूट पाणी साचले आहे. या डोहात २५ जानेवारी रोजी लोहमार्गाचे काम करणाऱ्या एका कामगाराची मुलगी सैलू रवी नेहावत (५ वर्षे) ही खेळत असताना पडली. यावेळी आसपास कोणीही नव्हते. आई-वडील मार्गाचे काम करीत होते. शेतात राहात असलेला संविधान दीपक गडसिंग (९) हा याचवेळी शाळेतून घराकडे परतत होता. त्यास ही मुलगी पाण्यात गटांगळ्या खात असताना दिसली. त्याने लगेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि बुडत असलेल्या सैलूला डोहाबाहेर ओढत आणले.  

चाटगाव शिवारातील स्वत:च्या शेतात गडसिंग कुटुंब राहते. संविधान हा गावातील जिल्हा परिषद प्रशालेत तिसऱ्या इयत्तेत शिक्षण घेतो.  शेतातून दीड ते दोन कि.मी. पायपीट करत तो न चुकता दररोज शाळेत येत असल्याचे त्याचे वर्गशिक्षक सांगतात. त्याच्या शेतातील घराच्या परिसरात परळी-बीड- अहमदनगर लोहमार्ग गेल्याने तेथे काम करण्यासाठी तेलंगणा राज्यातून जवळपास २० ते २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. या सर्व कुटुंबातील सदस्य लोहमार्गाच्या कामांत दिवसभर व्यस्त असतात. आज पंधरा दिवस लोटले तरी या धाडसाबाबत संविधानचे कुठेही कोडकौतुक न झाल्यामुळे संविधानच्या आई-वडिलांना याची खंत वाटते.  तेथील सामाजिक कार्यकर्ते बाबा देशमाने यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

कठीणप्रसंगी प्रसंगावधान व धाडसी वृत्ती राखत केलेल्या कार्याबद्दल संविधान गडसिंगचे कौतुक वाटते. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.  - डॉ. रमेश गटकळ, सामाजिक कार्यकर्ते

ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे, धाडस आहे. मात्र त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे असताना संविधान गडसिंगच्या धाडसाचे कौतुक करण्याचे धारिष्ट्य शाळेने दाखवले नाही, ही संताप आणणारी बाब आहे.- बाबा देशमाने, ग्रामस्थ, चाटगाव

मी व माझे कुटुंब शेतात राहतो. माझा मुलगा संविधान यास वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून चांगले पोहायला येते. तो नुसता पोहण्यातच तरबेज आहे, असे नाही तर तो शेतात विंचू, साप आदी सरपटणाऱ्या प्राण्यांना न भीता हुसकावून लावतो. त्याच्या या धाडसाची आम्हालाच कधीकधी भीती वाटते.- दीपक गडसिंग (संविधानचे वडील)

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीrailwayरेल्वे