शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परळीतील ट्विस्ट; आधी समाधान मुंडेला मारहाण, मग बदल्यासाठी शिवराज दिवटेला बदडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:58 IST

या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बीड : परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिवटेला मारहाण करताना दिसणारा लांब केस असलेल्या समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. या प्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, तर दुसऱ्या बाजूला या घटनेला जातीय रंग देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

१६ मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यासाठी शिवराज दिवटे (वय १८, रा. लिंबोटी, ता. परळी) हा मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून डाेंगरात नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर पायाही पडायला लावले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवराजच्या जबाबावरून २० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, सातजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

दरम्यान, जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे आता तक्रार घेऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात परळीत गुन्हा दाखल केला जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

गुन्हेगाराला जात नसतेदिवटे प्रकरणात काही लोकांनी आरोपींच्या आडनावावरून जातीय उल्लेख करीत सोशल मीडियावर वादंग उठवत जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांना जात नसते. मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच कोणीही असे प्रकार करून करिअर खराब करून घेऊ नये. शांतता राखावी. असे काही घडत असेल तर पोलिसांना कळवा. आम्ही २४ तास सेवेत आहोत. सोशल मीडियावरही वादग्रस्त पोस्ट करू नये, अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.

तक्रार येताच गुन्हा दाखल करूदिवटे प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यात दोन अल्पवयीनसह सात आरोपी ताब्यात आहेत. आता समाधान मुंडे नावाच्या तरुणालाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ आला आहे. त्यातही तक्रार येताच गुन्हा दाखल केला जाईल. तशी प्रक्रिया परळीत सुरू आहे.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड