शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

रोगप्रतिकार शक्तीसाठी आहाराकडे लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी, आजकाल प्रत्येकजण ...

अंबाजोगाई : कोरोनानंतर संपूर्ण जगच बदलून गेले आहे. कोरोना संसर्ग झाला तरी फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी, आजकाल प्रत्येकजण कोरोना होऊच नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविताना आहारात मूग, मटकी आदी कडधान्ये, ताज्या भाज्या, फळे, मांसाहार, दूध, हळदीचा वापर करत आहेत.

शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार तर आवश्यक आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नेमके काय खावे, म्हणजे कोरोनाच होणार नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे; मात्र शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच दररोज शरीराला व्यायामाचीही गरज आहे. दररोज दूध, हळद, फळे आहारात असणेही खूप गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ नागरिकांना देत आहेत.

कोरोनामुळे अनेकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे कमी केले आहेत. मात्र एरव्ही अनेक जण फास्ट फूड आवडीने खात होते. आता मात्र एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे आरोग्यावर फास्ट फूडचा होणारा परिणाम, यामुळे सध्या फास्ट फूडवर अघोषित बंदीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. फास्ट फूडमुळे आरोग्यावरही विपरित परिणाम होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेत. अंडी, दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. दुधामुळे पचन होण्यास मदत होते.

अशी मिळू शकतात जीवनसत्त्वे...

प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्त्व, तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्त्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्त्व, रक्तासाठी ‘क’ जीवनसत्त्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. या सर्व जीवनसत्त्वांची गरज आपणास विविध पालेभाज्या आणि कडधान्यांतून भागवता येते.