शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘टिमकी बजाव’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:48 AM

बीड : निराधार सर्वसामान्य व शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरलेल्या जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘टिमकी बजाव’ आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. बीड नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे ...

बीड : निराधार सर्वसामान्य व शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरलेल्या जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘टिमकी बजाव’ आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. बीड नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, सिध्देश्वरनगर, नवनाथनगर, एमआयडीसी, गांधीनगर, प्रकाश आंबेडकरनगर, मोची गल्ली, संत नामदेवनगर, बलभीमनगर, गोरे वस्ती, बांगर नाला या भागातील दारिद्र्य रेषेचा सर्व्हे करा, चलन भरलेल्या रेशन कार्डचे तात्काळ वाटप करा, गॅस आणि पेट्रोल दरवाढ कमी करा, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या याद्या जाहीर करा, संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तात्काळ घ्या, जुनी चार हजार प्रकरणे निकाली काढा, जिल्हा पुरवठा विभागाच्या कारभाराची चौकशी करा यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

या आंदोलनात ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी. बागल, तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, बबन गवते, शिवाजी जाधव, फारूक पटेल, बरकत पठाण, अमर नाईकवाडे, रमेश चव्हाण, प्रभाकर पोकळे, अ‍ॅड.इरफान बागवान, रणजित बनसोडे, भैय्यासाहेब मोरे, शेख आमेर, बाजीराव बोबडे, बिभीषण लांडगे, सय्यद मुजीब, अब्दुल खदिर जवारीवाले, हिराबाई कांबळे, वंदना धन्वे, वंदना जाधव, शेख अशफाक, राजु पैठणे, कपिल इनकर, राजू महूवाले यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.