शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

राष्ट्रवादीचे विटेकर गेले विधानसभेत, त्यांच्या बदल्यात योगेश क्षीरसागर जाणार विधानपरिषदेत?

By सोमनाथ खताळ | Updated: November 27, 2024 12:57 IST

मुंबईत फिल्डिंग, मराठवाड्याचाच राहणार विधानपरिषद सदस्य

बीड : विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिकामी झाली आहे. आता त्या जागेवर बीडचे डॉ. योगेश क्षीरसागर यांची वर्णी लागणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात मुंबईत चर्चाही झाली असून, फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. ही जागा मराठवाड्यातच राहावी, यासाठीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी निवडणूक होऊन निकाल लागला होता. यामध्ये मराठवाड्यातून परळीच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पाथरीचेअजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना आमदारकी मिळाली होती.  त्यानंतर विटेकर हे लगेच विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरले. त्यांनी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला. त्यामुळे विटेकर यांची जागा रिकामी झाली. 

दुसऱ्या बाजूला बीड मतदारसंघातून अवघ्या ५ हजार मतांनी निसटता पराभव झालेले अजित पवार गटाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी पराभूत झाला असला तरी आमदार म्हणून काम करा, अशा सूचना डॉ. योगेश यांना देण्यात आल्या. तसेच पाथरीच्या जागा पुन्हा मराठवाड्यातच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विचार केला जात आहे. सर्वांत आघाडीवर डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी हुकलेले डॉ. योगेश यांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंडे बहीण-भाऊ धरणार आग्रहबीडमधून डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, म्हणून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांनी महायुतीकडे आग्रह धरला होता. त्यानंतर प्रचारातही त्यांनी जोर दिला होता. परंतु, डॉ. योगेश यांचा निसटता पराभव केला. आता त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मुंडे बहीण-भावाकडून डॉ. योगेश यांना विधान परिषद सदस्य करण्यासाठी महायुतीकडे आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.

पक्षश्रेष्ठींच्या भेटीला मुंडेंसोबत योगेश क्षीरसागरविधानसभेचा निकाल लागताच परळीचे धनंजय मुंडे हे अजित पवार, सुनिल तटकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे यावेळी बीडचे डॉ.योगेश क्षीरसागरही त्यांच्यासोबत होते. पराभव झाला तरी धनंजय मुंडे यांच्याकडून डॉ.योगेश यांना बळ दिले जात असल्याचे यावरून दिसून येत आहे. यावर योगेश क्षीरसागर यांनीही यशाचे स्वागत आणि उमेदवारी आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त करायला गेल्याची भावना सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे. परंतू या भेटीत काय चर्चा झाली, हे समजले नाही.

पक्षश्रेष्ठी निर्णय घेतीलविधानसभेत निसटता पराभव झाला, हे मान्य आहे. आगामी काळात यात सुधारणा केल्या जातील. विधान परिषद सदस्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मी यावर काहीच बोलणार नाही. परंतु, पक्ष जी संधी देईल, त्याचे सोने करण्यासाठी मी तत्पर असेल. - डॉ. योगेश क्षीरसागर, बीड

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024beed-acबीडpathri-acपाथरीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAjit Pawarअजित पवार