शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:30 IST

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास क्षीरसागर बंधूना ठरवले जबाबदार

बीड : शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नूतन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केले आहे. शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मागील दीड महिन्यांपासून मुंबईत तळ ठोकून होते, अशी टीका मंत्री क्षीरसागर याचे पुतणे तथा जिल्हापरिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली. 

बीड शहरात मागील अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील नगरपालिकेच्या नियोजना अभावी पाणी पुरवठा विस्कळीत आहे. शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नाही यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, मा.आ. सुनील धांडे, बबन गवते, हेमा पिंपळे, बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीचे नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक, महिला डोक्यावर हंडा घेऊन नागरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला तरी देखील पाणी पुरेल मात्र, नगरपालिकेचे नियोजन ढिसाळ असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच पुढील काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी विविध प्रश्नांवर आक्रमक होणार असून, प्रश्न सुटले नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले. 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस