शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 17:44 IST

काही दिवसांपूर्वीच आ. प्रकाश सोळंके यांनी जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश करेल असे जाहीर केले होते.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आज हैदराबादमध्ये भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच आ. सोळंके यांनी जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश करेल असे जाहीर केले होते. यामुळे या भेटीने मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. 

आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांनी के. चंद्रशेखरराव यांची हैदराबादमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तेलंगणातील शेतकऱ्यांसाठीचे धोरण आणि योजना, राज्यातील विकास योजनांची आखणी, विद्यार्थी, मजूर, काम करण्याची पद्धत यावर चर्चा केली. तसेच तेलंगणात मेडिकल, इंजिनियरिंग सोबत अन्य उच्च शिक्षणासाठी सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांचा खर्च राज्य सरकार करते. महाराष्ट्रात देखील शेतकरी आणि उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणांसाठीच्या ठोस धोरणावर आ. सोळंके यांनी मुख्यमंत्री राव यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेड येथील सभेने प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री राव महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यावर भर देत आहेत. या पार्श्वभूमीवर आ. सोळंके यांच्या भेटीला महत्व आले आहे. आ. सोळंके बीआरएस पक्षात जाण्याचा देखील विचार करू शकतात अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके हे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यासोबत भेट घेऊन येत आहेत. त्यामुळे ते विविध पक्षावर दबाव तंत्राचा वापर करत असल्याच्या चर्चेवर विरोधकांकडून मात्र टीका होताना दिसून येत आहे.

जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पंधरा दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर विचारले असता त्यांनी सांगितले होते की, जनतेची इच्छा असेल तर मी भाजपाच काय शिंदे गटात देखील जाऊ शकतो. त्याचबरोबर यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कामाची स्तुती केली होती. यामुळे या पक्षात देखील ते प्रवेश करू शकतील असे त्यांच्या मनात विचार असल्याचे दिसून आले होते. 

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBeedबीड