शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
2
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
3
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
4
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
5
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
6
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
7
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
8
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
9
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
10
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
11
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
12
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
13
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
14
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
15
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
16
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
17
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
18
पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!
19
Gold Silver Price Today: मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीचे दर घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत
20
Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:30 IST

गेवराईत निवडणुकीतील राजकीय वैमनस्य आणि स्थानिक पातळीवरील तणाव शिगेला

गेवराई (बीड): बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतदानाच्या प्रक्रियेला आज सकाळी हिंसक वळण लागले. प्रभाग क्रमांक १० येथील मतदान केंद्रावर सुरू झालेला शाब्दिक वाद लवकरच टोकाला गेला आणि भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोरच तुफान दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटांकडून झालेल्या या हल्ल्यात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

पंडित विरुद्ध पवार गट आमनेसामनेगेवराई नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पंडित गट आणि भाजपचा पवार गट यांच्यात चुरस आहे. मतदानाच्या वेळेस या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली. हा तणाव वाढून थेट माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर पोहोचला. दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार दगडफेक आणि हल्ला चढवण्यात आला. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित गटाचे कार्यकर्ते भाजपचे माजी आमदार पवार यांच्या घरासमोर जमले. यामुळे तणावामध्ये अधिक भर पडली. यावेळी अचानक दगडफेक सुरू झाली. पवार यांच्या घरासमोरील गाड्या फोडण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांचा लाठीचार्ज, परिस्थिती नियंत्रणातशहरात अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि वाहनांच्या काचा फोडल्याच्या घटना घडल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर केंद्राबाहेरील गर्दी पांगवण्यात आली असून, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: NCP-BJP clash in Georai, stone pelting at leader's house.

Web Summary : Violence erupted during Georai municipal elections as NCP and BJP groups clashed. Stone pelting occurred near ex-MLA Pawar's house, damaging vehicles. Police intervened with a baton charge to restore order and voting resumed.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकBeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या