शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कौटुंबिक वादातून नायब तहसीलदार बहिणीवर सख्या भावाने केला कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:05 IST

कौटुंबिक कारणातून हल्ला केला असल्याची शक्यता असून हल्लेखोर भाऊ पोलिसांच्या ताब्यात आहे

केज (बीड) : येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, आशा वाघ या येथील तशील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे आज आज सकाळी त्या कार्यालयात आपले काम करत होत्या. सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ ( ४५,दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) हा कार्यालयात आला. त्याने काही कळायच्या आता बहिण आशावर कोयत्याने मानेवर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. आशा वाघ याच अवस्थेत जीवाच्या आकांताने शेजारील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात पळाल्या. दरम्यान, कार्यालयात उपस्थित नागरिकांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास पकडून पकडून ठेवले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. आशा वाघ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कौटुंबिक कारणातून केला हल्लाहल्लेखोर मधुकर वाघ आणि नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. शेतीच्या आणि अन्य वादातून त्यांने टोकाचे पाऊलं उचलत आज जळगाव येथून येत थेट कार्यालयात घुसून सख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडRevenue Departmentमहसूल विभाग