शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत खालपासून वरपर्यंत गद्दारांची फौज; सुरेश धस यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 18:33 IST

राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी आज दुपारी आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्दे धनजंय मुंडे विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणारराष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत खालपासून वर पर्यंत सर्व गद्दारांची फौज भरली आहे

आष्टी (बीड ) : स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कुटूंबाचा छळ करण्यासाठीच राष्ट्रवादी कॉग्रेसने धनजंय मुंडेना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले आहे. तसेच जे विधान परिषदमध्ये फक्त मॅनेजमेंट करतात त्या धनजंय मुंडेनी आपल्यावर केलेल्या आरोपावर ठाम रहावे,  त्यावेळेस त्यांनी शेपुट घालून गप बसू नये असे आवाहन माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी पञकार परिषदेद्वारे केले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी आज दुपारी आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, कडा ग्रामपंचायतची सरपंच अनिल ढोबळे, युवराज पाटील, सुनिल रेडेकर,माऊली जरांगे यांच्यासह आदि उपस्थित होते. 

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

पुढे बोलतांना धस म्हणाले, धनजंय मुंडे हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत ते पवार काका-पुतण्याचे केंव्हा होणार. काल भरसभेत त्यांनी मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 15 कोटी रूपये घेतल्याचा आरोप केला त्या आरोपावर त्यांनी आपण ठाम रहावे. स्व.पंडित आण्णा हे स्वतःच्या शब्दावर ठाम असायचे त्यांनीही यावेळी आपल्या शब्दावर ठाम राहवे कारण आपण त्यांच्यावर रितसर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. 

राष्ट्रवादी कारखानदारांचा पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा बड्या बड्या कारखानदार व  मोठमोठ्या राजकीय वारसा असलेल्या मराठा समाजाचा हा पक्ष असून आपल्या सर्व सामान्य शेतकरी यांच्या जिवावर राजकरण करतात पण हा पक्ष मराठ्याचा नावावर मोठा झाला पण हा पक्ष मराठ्यांचा नाही असा आरोप धस यांनी केला.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला गद्दारांची निष्ठाज्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत खालपासून वर पर्यंत सर्व गद्दारांची फौज भरली आहे. त्या पार्टीच्या नेत्यांनी आम्हाला गद्दार म्हण्यापेक्षा स्वतःच्या पार्टीच्या नेत्यांचे आत्मपरिक्षण करावे कारण त्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीला गद्दारांची निष्ठा असणा-यांना गद्दार म्हण्याचा नैतीक अधिकार नाही,असा टोला धस यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लागावला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस