शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:48 IST

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तरूणावर उपचार सुरू आहेत

परळी: पुण्याहून नांदेडकडे जात असलेल्या तरुणाने परळी रेल्वे स्थानकावर उतरून परळीच्या बस स्थानकाजवळ आत्महत्येच प्रयत्न केला. दत्ता दीपक गोंडेकर ( वय 24 वर्ष राहणार नांदेड ) असे सदरील युवकाचे नाव आहे. बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारच्या वेळी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केले त्यामुळे दत्ता गोंडेकर हा रक्तबंबाळ झाला होता अशा अवस्थेत त्यास परळीच्या शहर पोलीस ठाण्याचे  पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भताने यांनी तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

परळीच्या उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार करून दुपारी पाचच्या सुमारास अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार चालू आहेत. या संदर्भात दत्ता गोंडेकर यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती कळविली आहे. दत्ता दीपक गोंडेकर हा पुण्याहून परळीला रेल्वेने आला होता. तो आपल्या गावी नांदेडला जाणार होता. परंतु परळीच्या बसस्थानक जवळ गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी करून घेतले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नेमका हा काय प्रकार आहे ?कशामुळे त्याने हा प्रकार केला? याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी