परळी : शहरात भुयारी गटार योजना, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेचे काम संथ गतीने होत असून प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेत श्रीमंतांना घरकुल मंजूर केली असून खऱ्या लाभार्थ्यांची नावे नामंजूर केल्याचा आरोप काॕँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपत कोरे यांनी केला आहे. या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात परळी शहर अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. भुयारी गटार योजनेच्या कामांची चौकशी करावी, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेत पात्र नसणाऱ्यांना घरकुल मंजूर केली आहेत तर ख-या लाभार्थ्यांना दूर ठेवले आहे. घरकुल वितरणात गैरप्रकार झाला असून १५ दिवसांच्या आत चौकशी करावी अन्यथा नगर परिषदेसमोर उपोषणाचा इशारा गणपत कोरे, युवानेते सय्यद अलताफ,उपाध्यक्ष अशोक कांबळे, युवक शहराध्यक्ष धर्मराज खोसे, ओबीसी काॕँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद शेख यांनी दिला आहे.