वॉटर कप जिंकण्यासाठी नाळवंडीकरांनी आवळली श्रमदानाची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:09 AM2019-04-24T00:09:31+5:302019-04-24T00:09:57+5:30

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत.

Nalvandikar's struggle to win water cup | वॉटर कप जिंकण्यासाठी नाळवंडीकरांनी आवळली श्रमदानाची वज्रमूठ

वॉटर कप जिंकण्यासाठी नाळवंडीकरांनी आवळली श्रमदानाची वज्रमूठ

Next
ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : दुष्काळमुक्तीसाठी आबालवृद्धांसह हजारो हात सरसावले; दररोज सायंकाळी ग्रामस्थ करतात साडेतीन तास श्रमदान

बीड : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत. अशा परिस्थितीत नाळवंडीकरांनी श्रमदानाची वज्रमूठ करीत सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्याचा संकल्प केला असून १६ दिवसांपासून श्रमदान सुरु आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन लाभले आणि गावाची दिशाच बदलली. उप मुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ. सुनिल भोकरे, चंद्रशेखर केकाण, मधुकर वासनिक आदि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साथ दिली. गावाने योग्य कामाकडे आगेकूच केली. बघता बघता गावाच्या एकीतून स्मार्ट तालुक्याचा प्रथम किताबही पटकावला. दुष्काळाच्या असह्य झळा गाव सहन करत आहे.ही दुर्दैवी बाब गावातील युवकांच्या लक्षात आली. पाणी फाऊंडेशनची स्पर्धा ही संधी समजून गावाने सहभागी होण्याचा निर्धार केला.पाण्यासाठी गाव एकवटले.
४८०० लोकसंख्येच्या नाळवंडीने दुष्काळमुक्तीच्या लढ्यात भाग घेतला. श्रमदानातून जलसंधारणाची व मनसंधारणाची कामे सुरू झाली. रात्रंदिवस शेकडो महिला, युवक, वयोवृद्ध घामाच्या धारा गाळून नाळवंडी दुष्काळ मुक्त, टँकरमुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिनगारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मिसाळ, डॉ.आबुज, मुख्याध्यापक घुमरे, मारोती नगर येथील तांड्यावरील बंजारा समाजाकडून श्रमदान करण्यात आले. शेकडो बंजारा बांधव, महिलांनी श्रमदान करून नाळवंडी दुष्काळ मुक्त करण्यासाठी साथ दिली आहे.
बांधबंदिस्ती, अनघड दगडांचा बांध
बांधबंदिस्ती, अनघड दगडी बांध, चर खोदणे, जुन्या बंधाºयांची दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येत आहे.
मौजवाडी, जरुड आणि नाळवंडी येथील नद्यांचा संगम येथे आहे. त्या आटल्या आहेत. त्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. शोषखड्डे खोदले आहेत. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले जात आहेत.
मानवलोकसह विविध सामाजिक संस्था, अधिकारी, ग्रामस्थ विविध माध्यमातून या कामी मदत करत आहेत. राज्याचे प्रथम बक्षीस जिकंण्याचा निर्धार नाळवंडीकरांनी केला आहे.

Web Title: Nalvandikar's struggle to win water cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.