शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आगरतांड्यावरील आगीचे गूढ उलगडले; आग लागली नव्हे, तर लावल्याचा अंनिसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:29 IST

आगरतांडा येथे दहा दिवसांपासून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आणि इतरही काही साहित्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू होता.गुरुवारी आग लागण्याचा प्रकार बंद झाल्याचे आगर तांड्यावरील ग्रामस्थांनी सांगितले.

चिंचाळा : वडवणी तालुक्यातील कुप्पा ग्रामपंचायतीअंतर्गत आगर तांड्यावर लागणाऱ्या आगीसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य आणि बीड जिल्ह्याच्या टीमने तपास करत हा प्रकार मानवनिर्मित असल्याचे पटवून दिले. दरम्यान, गुरुवारी आग लागण्याचा प्रकार बंद झाल्याचे आगर तांड्यावरील ग्रामस्थांनी सांगितले.

आगरतांडा येथे दहा दिवसांपासून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आणि इतरही काही साहित्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू होता. दरम्यान, अंनिसच्या टीमने आगर तांडा येथे बुधवारी दिवसभर आग कशी लागते, कधी लागते आणि कशामुळे लागते, याचा शोध आणि निरीक्षण सुरू केले. आग लागत असलेल्या घरांची पाहणी करून आणि येथे राहणाऱ्या लोकांची विचारपूस सुरू केली. यानंतर हा प्रकार जादूटोण्याचा नसून कोणीतरी मुद्दाम ही आग लावत असल्याचे अंनिसकडून सांगण्यात आले. तांड्यावरील ग्रामस्थांना आग कशी लावली जाते, याची प्रात्यक्षिकेही करून दाखवली.

ही आग मानवनिर्मितआगर तांड्यावर लागणारी आग त्याच परिसरातील खोडकर व्यक्तीकडून अंधश्रद्धा पसरविण्याच्या दृष्टीने लावण्यात येत होती. या ठिकाणी अंनिसच्या टीमने तपास पूर्ण केला आणि आग लावणारी व्यक्ती शोधून काढलेली आहे. या व्यक्तीचे फक्त नाव जाहीर केलेले नाही. येथून पुढे तांड्यावर आग लागणार नाही.- माधव बागवे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस.

गुरुवारी आगीची घटना नाहीआगर तांड्यावर दहा दिवसांपासून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आग लागत होती. परंतु. बुधवारी अंनिसची टीम आणि पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केल्यापासून येथे गुरुवारी दिवसभरात आग लागण्याची घटना घडली नाही.- मानसिंग जाधव, ग्रामस्थ, आगरतांडा, कुप्पा.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी