शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पोच्या धडकेत माय-लेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:18 IST

केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वरांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उत्रेश्वर पिंपरी चौफळ्यावर घडला. मयत हे कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील रहिवाशी आहेत.

ठळक मुद्देउत्रेश्वरांच्या दर्शनाहून परतताना काळाचा घाला; सायंकाळच्या वेळेस घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वरांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उत्रेश्वर पिंपरी चौफळ्यावर घडला. मयत हे कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथील रहिवाशी आहेत.श्रीकांत (२३) व भागीरथीबाई मच्छिंद्र कवडे (४७) असे मयत मायलेकाचे नाव आहे. श्रीकांत व त्याची आई हे दोघे दुचाकीवरून (एमएच २५ एजी ४५४०) केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते सायंकाळच्या सुमारास गावाकडे परतले. उत्रेश्वर पिंपरीपासून २ किमी अंतरावर असलेल्या चौफळ्यावर आले असता कापूस घेऊन जाणाºया भरधाव टेम्पोने (एमएच १० - के ७७६६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या टायरखाली आली. त्यामुळे दोघेही तब्बल ३५ पेक्षा जास्त फुटापर्यंत फरफटत गेले. यात दोघेही जागीच ठार झाले.घटनेची माहिती मिळताच केजचे फौजदार सुरेश माळी, जमादार जाधव, अमोल गायकवाड, अण्णासाहेब राठोड, सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात