शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या पतीला या कारणासाठी दुसरीकडे पाठवले, कराडचे नाव घेत महादेव गित्तेच्या पत्नीचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 20:09 IST

काही दिवसापूर्वी बीड येथील तुरुंगात वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले.

बीडमधील तुरुंगात काही दिवसापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोप वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले होते.  यानंतर महादेव गित्ते याची रवानगी दुसऱ्या कारागृहात केली आहे. दरम्यान, आता यावरुन महादेव गित्ते याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.

"मला जेव्हा भिसेंच्या कुटुंबीयांचा फोन आला, तेव्हा..."; 'दीनानाथ'च्या डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितलं नेमकं काय बोलणं झालं

महादेव गित्ते याची पत्नी मीरा गित्ते यांनी मारहाण प्रकरणावरुन आरोप केले आहेत. "माझ्या पतीवर कारागृहात हल्ला करण्यात आला, त्या प्रकरणात मला गुन्हा दाखल करायचा होता, म्हणून मी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मात्र कारागृह प्रशासन आमच्या आधीन नाही, त्यामुळे तुम्ही कारागृह प्रशासनाकडे तक्रार करा अशी माहिती मला यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली. वाल्मीक कराडला आतमध्ये चांगली व्यवस्था मिळावी यासाठीच माझ्या पतीला कारागृहातून बाहेर काढले आहे, असा गंभीर आरोप मीरा गित्ते यांनी केला.  सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत

मीरा गित्ते म्हणाल्या, वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने माझ्या पतीसह त्यांच्या मित्राला मारहाण केली आहे. उलट माझ्या पतीवरच मारहाण केल्याचा आरोप करत त्यांना बीड  कारागृहातून हर्सुल कारागृहात स्थलांतरित करण्यात आलं. आतमध्ये त्यादिवशी नेमकं काय घडलं याची माहिती समोर यावी म्हणून मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे.  मात्र अर्ज करून देखील मला फुटेज मिळालेले नाहीत, असंही गित्ते म्हणाल्या. 

बीड कारागृहात नेमकं काय घडलं? धसांचा दावा काय?

आमदार सुरेश धस यांनी बीड कारागृहातील घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं मला कळालं," असं धस यांनी सांगितलं होतं.

टॅग्स :Beedबीडwalmik karadवाल्मीक कराडPoliceपोलिस