शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्ष पतीचा खून आर्थिक व्यवहारातून; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:05 IST

तीन आरोपींत एका माजी नगराध्यक्ष पतीचाही समावेश

ठळक मुद्देआरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

धारूर (जि. बीड) :  येथील माजी नगराध्यक्षांचे पती तथा नगर परिषदेचे कर्मचारी नामदेव शिनगारे यांच्या खून प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून  आर्थिक वादातून घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे. विशेष म्हणजे अटकेतील आरोपी सुखदेव ऊर्फ  बबन फुन्ने हा दुसऱ्या एका माजी नगराध्यक्षांचा पती आहे.

शहरात माजी नगराध्यक्ष सविता शिनगारे यांचे पती  नामदेव शिनगारे यांचा सोमवारी दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी रात्री उशीरा धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आपल्या तपासाचे चक्र गतिमान करत यामधील आरोपी सुखदेव ऊर्फ  बबन फुन्ने, गणेश शिवाजी घोडके, सुभाष तुकाराम शिंदे यांना अटक केली. तसेच इतर तीन अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. 

आरोपी सुखदेव उर्फ बबन फुन्ने याच्या मुलीच्या लग्नासाठी नामदेव शिनगारे यांनी पैसे दिले होते. ते पैसे परत करण्यावरुन झालेल्या वादात डोक्यात दगड घालून नामदेव शिनगारे यांचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून शिवाजी घोडके व सुभाष शिंदे यांना अटक केली. तिसरा आरोपी फुन्ने याला मंगळवारी ताब्यात घेतले.

धारूर दुपारपर्यंत बंद या प्रकरणातील मुख्य आरोपी सुखदेव ऊर्फ बबन फुन्ने यास अटक करा? अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धारूर शहर कडकडीत बंद होते. रमेश आडसकर यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दुपारी शवविच्छेदन करण्यात आले तसेच महाविद्यालयासमोरील स्मशानभूमीत शिनगारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान पोलिसांनी देखील मुख्य आरोपीस ताब्यात घेतले होते. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

१६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी खून प्रकरणातील आरोपी गणेश घोडके व सुभाष शिंदे यांना मंगळवारी पहाटे अटक केल्यानंतर त्यांना धारूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :MurderखूनBeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस