शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे परिवाराचे जुळले, ठाकरे, पवारांची जवळीक; आता बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?

By सोमनाथ खताळ | Updated: December 25, 2025 19:02 IST

सत्तेसाठी नात्यांची गणिते जुळवण्याची आता बीडमध्ये क्षीरसागरांना संधी

बीड : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. या निकालांनी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी दिली आहे. एका बाजुला नगरपालिकांमध्ये बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू असताना, दुसऱ्या बाजुला आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोठ्या राजकीय परिवारांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या राजकारणात परळीतील मुंडे परिवार आधीच एकत्र आला असून, आता ठाकरे आणि पवार परिवारानंतर बीडच्या क्षीरसागर परिवारातही मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांमधील जवळीक वाढताना दिसत आहे. उध्दवसेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी युती झाली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका - पुतण्या महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. कौटुंबीक जवळीक आणि राजकीय निकड यामुळे ही दोन कुटुंब पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसू शकतात. राजकारणातील कट्टर शत्रुत्व बाजूला ठेवून आता 'नात्यांच्या गणितांनी' सत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत.

बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर परिवाराचे मोठे वलय आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून हा परिवार राजकीयदृष्ट्या विभागलेला आहे. परळीत ज्याप्रमाणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी 'महायुती'च्या माध्यमातून एकत्र येऊन सत्ता काबीज केली, तोच फॉर्म्युला बीडमध्ये राबवण्याची संधी आता चालून आली आहे.

बहुमतासाठी क्षीरसागर बंधूंना हवे एकमेकांचे सहकार्यबीड नगरपालिकेत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार - विजयसिंह पंडित गट), भाजप (योगेश क्षीरसागर गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार - संदीप क्षीरसागर गट) यांच्या जागांची गोळाबेरीज पाहता, बहुमतासाठी एकमेकांचे सहकार्य घेणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत, सत्तेसाठी आणि शहराच्या विकासासाठी दोन्ही क्षीरसागर बंधूंना (संदीप आणि योगेश क्षीरसागर) एकत्र येण्याची ऐतिहासिक संधी आहे. हे मनोमिलन झाले, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये बीडमध्ये पुन्हा एकदा 'क्षीरसागर' ब्रँडचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.

गेवराईचा पंडित परिवार विभागलेलाचगेवराईत उद्धवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बदामराव पंडित आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे आ. विजयसिंह पंडित व माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यात अद्याप मनोमिलन झालेले नाही. गेवराई नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली असून, येथे पंडित गटाचा दारूण पराभव झाला आहे. बदामराव पंडित हे अमरसिंह आणि विजयसिंह यांचे नात्याने काका आहेत. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता येथे या कुटुंबाचे मनोमिलन होणे कठीण असल्याचे दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Munde, Thackeray, Pawar families unite; Ksheersagar brand next in Beed?

Web Summary : Maharashtra witnesses political realignments post-election. Munde, Thackeray, Pawar families unite. Ksheersagar family in Beed may follow for power consolidation in upcoming elections, creating a 'Ksheersagar' brand dominance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Beedबीड