बीड : ‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, आरक्षण हे संविधानाप्रमाणे ५० टक्क्यांपर्यंतच असावे, एयर मार्किंग पद्धत पूर्णपणे बंद करावी, खुल्या प्रवर्गातील लोकांना खुल्या प्रवर्गात व आरिक्षत प्रवर्गातील लोकांना आरक्षित जागेचा लाभ मिळावा, पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण पूर्णपणे बंद करावे, आर्थिक निकषांवर सर्व वर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, २६ जानेवारी २०२० रोजी आरक्षणाची मर्यादा संपत आहे, त्यासाठी सरकारने श्वेतिपत्रका जारी करून या आरक्षणाचा कितपत फायदा झाला हे जाहीर करावे आदी मागण्यांसाठी रविवारी धरणे आंदोलन झाले.यावेळी आदेश नहार, राहुल जाजू, प्रमोद पुसरेकर, नंदकिशोर जेथलिया, मनोज अग्रवाल, डॉ.किशोर कोटेचा, डॉ विनोद ओस्तवाल, डॉ.प्रसाद वाघिरकर, डॉ.दिवाकर गुळजकर, डॉ.अविनाश देशपांडे, प्रशांत देशपांडे, डॉ.संजीवनी कोटेचा, शोभा जेथलिया, डॉ. डिंपल ओस्तवाल, स्वाती शिरपूरकर, मंजुषा कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अनिता गजरे, संगीता धसे, मानसी पुसरेकर, संगीता विर्धे, शीतल अंबेकर, अक्षय भालेराव, रोहित कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, अशोक कडेकर, अमोल आगवान, डॉ.अनुराग पांगरीकर, अमोल जोशी, चंद्रशेखर अंबेकर, मिलिंद कुलकर्णी, धनंजय गोस्वामी आदी सहभागी झाले होते.
‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:57 IST
‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन
ठळक मुद्देआर्थिक निकषांवर सर्व वर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ द्यावा