शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अडीच महिन्याच्या ‘नकोशी’ला रस्त्यावर सोडून माता फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:09 IST

गेवराई तालुक्यातील घटना : चिमुकलीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

ठळक मुद्देग्रामस्थांनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन जिल्हा रूग्णालयात दाखल केले.सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत

बीड : एकीकडे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजुला आजही समाजाची मानसिकता बदलली नसल्याचे समोर आले आहे. एका अडीच महिन्याच्या जिवंत मुलीला रस्त्यावर सोडून देत माता फरार झाली. ही घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंंगीजवळील टोलनाका परिसरात मंगळवारी पहाटे उघडकीस आली. ग्रामस्थांनी या चिमुकलीला ताब्यात घेऊन जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

पाडळसिंगीजवळील टोलनाका परिसरात एका बाळाचा रडण्याचा आवाज याच भागात राहणाऱ्या नागरिकांच्या कानी पडला. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना एक मुलीला टॉवेलमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला टाकलेले दिसले. हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आयआरबी कंपनीच्या रूग्णवाहिकेला संपर्क केला. ते अवघ्या पाच मिनीटांत पोहचले आणि चिमुकलीला घेऊन पहाटे ५ वाजता जिल्हा रूग्णालयात आले. येथील डॉ.मोहिणी जाधव व त्यांच्या टिमने या चिमुकलीवर तात्काळ उपचार केले. सध्या या बाळाची प्रकृती ठणठणीत असून अद्याप याची पोलीस दप्तरी नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

‘त्या’ प्रकरणाचा तपास अद्यापही अपूर्णचबीड तालुक्यातील कपीलधारवाडी येथे पंधरा दिवसांपूर्वी दोन दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे अर्भक आढळले होते. या बाळावर उपचार करून नंतर शिशुगृहात पाठविण्यात आले होते. हे बाळ कोणी टाकले, याचा तपास मात्र, अद्यापही बीड ग्रामीण पोलिसांना लागलेला नाही. 

डॉक्टर, ग्रामस्थांकडून मायेची उबचिमुकली सापडताच ग्रामस्थांनी तिला जवळ घेऊन दुध पाजले. जिल्हा रूग्णालयात आल्यावर डॉ.मोहिणी जाधव-लांडगे, परीचारीका मोहोर डाके, मिरा नवले यांनी तिला आंघोळ घालून उपचार केले. तसेच मायेची उबही दिली. बाळाचे वजन साडे तीन किलो असून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉ.जाधव यांनी सांगितले. फरताडे अमोल, गणेश काळे, सोनू देवडे आयआरबीच्या  या कर्मचाऱ्यांनीही मदत केली.

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडPoliceपोलिसFamilyपरिवार