महिला सरपंचासह सासू, सासऱ्यांची घरात राहूनच कोरोनावर मात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:16+5:302021-05-11T04:35:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : महिला सरपंचासह वयस्कर सासू, सासरे व घरातील सहा सदस्य वीस दिवसांपूर्वी कोरोनाने बाधित ...

Mother-in-law, mother-in-law and father-in-law stay at home and overcome Corona - A | महिला सरपंचासह सासू, सासऱ्यांची घरात राहूनच कोरोनावर मात - A

महिला सरपंचासह सासू, सासऱ्यांची घरात राहूनच कोरोनावर मात - A

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : महिला सरपंचासह वयस्कर सासू, सासरे व घरातील सहा सदस्य वीस दिवसांपूर्वी कोरोनाने बाधित झाले होते. या सर्वांनी घरात राहूनच प्रबळ इच्छाशक्तीने व उपचार करून कोरोनावर मात केली. आज सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे.

शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी हे १५०० लोकवस्तीचे गाव शिरूरपासून अवघ्या अडीच किलोमीटरवर आहे. शीलावती मोरे या येथील सरपंच आहेत. येथील नागरिकांची सतत शहरात वर्दळ असते. कोरोनाचा गावात देखील शिरकाव झाला. यातून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सरपंच मोरे यांंनी विविध उपाययोजना केल्या होत्या. कोरोनाबाबत जनजागृती करून नियम पाळण्याचे आवाहन केले जात होते, तरी देखील झापेवाडीत कोरोनाचा शिरकाव झालाच. १९ लोकांना कोरोनाने बाधले होते. यावेळी थेट सरपंचासह घरचे सहा सदस्य बाधित झाले. बापूराव मोरे व त्यांची पत्नी वयस्कर असल्याने चिंता वाटत होती. मात्र, त्यांनी हिंमत सोडली नाही. आपण सर्वजण यातून सहीसलामत सुटू, असा आत्मविश्वास धरून घरातच सर्वजण विलगीकरणात राहिले. नित्य औषधींसह गरम पाणी, वाफ, काढा यासोबतच सकस आहारावर भर दिला. परिणामी कोरोनाला हरवण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र, गावातील एकाला मृत्यूने गाठलेच. त्याचे दुःख झाले. ... ग्रामस्थांमुळे मनोधैर्य वाढले

गावाच्या बाहेर वस्तीवर शीलावती मोरे यांचे घर आहे. गावची जशी काळजी होती. तशी कुटुंबाची होती. वयस्कर सासू-सासऱ्यांची जबाबदारी होतीच. पती गोकुळ मोरे यांच्या सहकार्याने व वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनावर मात केली. त्यामुळे गावातील सर्वांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली, असे सरपंच मोरे यांनी सांगितले. ... कोरोना झाला म्हणून आम्ही घाबरलो नाही, तर परमेश्वरावरचा विश्वास ठेवत या वयातही मनोधैर्य खचू न देता सामोरे गेलो. यातून सहीसलामत बाहेर आलो. घाबरून न जाता योग्य उपचार व नियमांचे पालन केल्यास कोरोनातून बरे होता येते, असे बापूराव मोरे यांनी सांगितले.

.... घरात एकाच वेळी सासू, सासरे व अन्य सहा सदस्य पाॅझिटिव्ह निघाले. थोडी घबराट झाली. मात्र, कुटुंब व गावची प्रमुख ही जबाबदारी ओळखून धैर्य खचू न देता सामोरे गेलो. घरातच विलगीकरणात राहून घरीच उपचार करून कोरोनामुक्त देखील झालो. कोरोनाची बाधा होऊच नये, यासाठी असलेली नियमावली पाळण्याचे आवाहन सरपंच शीलावती मोरे यांनी केले.

.. फोटो ओळी - शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील कोरोनातून बरे झालेले सरपंच शीलावती मोरे यांचे कुटुंब.

===Photopath===

090521\4659vijaykumar gadekar_img-20210508-wa0018_14.jpg

Web Title: Mother-in-law, mother-in-law and father-in-law stay at home and overcome Corona - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.