शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे चोरट्याने पळवले; प्रतिकार करताना महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:05 IST

मुलास दहावीत ९५ टक्के मार्क मिळाल्याने तय्च्या पुढील शिक्षणासाठी या दाम्पत्याने रोख रक्कम दोन दिवसापुर्वीच जमा करून घरी ठेवली होती. 

परळी : येथील पंचवटीनगरमध्ये चोरट्याने घरफोडी करून रोख 80 हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण 2 लाख 12 हजाराचा ऐवज पळवला. ही घटना गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी प्रतिकार करणाऱ्या महिलेस चोरट्याने चाकूने वार करत जखमी केले आहे. दरम्यान, मुलास दहावीत ९५ टक्के मार्क मिळाल्याने तय्च्या पुढील शिक्षणासाठी या दाम्पत्याने रोख रक्कम दोन दिवसापुर्वीच जमा करून घरी ठेवली होती. 

याबाबतची अधिक माहिती अशी कि, येथील नेहरू चौक भागातील पंचवटीनगरमध्ये  बालाजी फड यांचे निवास्थान आहे. बुधवारी रात्री फड कुटुंबीय झोपलेले असताना पहाटे एक चोरटा घरात घुसला. एका रूममधील कपाट उघडून त्याने रोख रक्कम आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कपाटाचा आवाज येत असल्याने फड यांच्या पत्नी अश्विनी झोपेतून जागे झाल्या. त्यांनी आरडाओरडा करण्याचा पर्यंत केला असता. चोराने त्यांच्यावर चाकूने वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यानंतर चोरटा 80 हजार रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. 

जखमी अश्विनी यांनी लागलीच बालाजी फड यांना झोपेतुन उठविले. त्यांनी चोरीची माहिती पोलिसांना दिली. परळी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनास्थळी आंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , परळी शहर पोलीस निरीक्षक हेमंत कदम  पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी भेट दिली.  या प्रकरणाचा तपास प्रदीप एकशिंगे हे करीत आहेत. 

मुलाच्या शिक्षणासाठी जमा केली होती रक्कमबालाजी फड यांचे वैद्यनाथ मंदिर समोर चहाचे हॉटेल आहे,  मंदिर बंद असल्याने ते हॉटेल ही पाच महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, फड यांचा मुलगा दहावी परीक्षेत 95 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याच्या पुढील शिक्षणासाठी पैसे लागतील म्हणून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पैसे जमा केले होते. हे पैसे चोरीला गेल्याने फड कुटुंबासमोर आता मुलाच्या  शिक्षणासाठी पैस्यांची सोय कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिसtheftचोरी