बीड : घरात घुसुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने अविनाश विलास जोगदंड यास ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.ए.एस. गांधी यांनी सुनावली.बीड शहरातील पेठ भागात अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. नातेवाईक गावाला गेलेले असताना एका तरुणाने घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १९६/१६ नुसार कलम ४५२ व ३५४ (अ) पोक्सोअंतर्गत कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल झाला होता.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. भोसले यांनी तपास पूर्ण करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (स्पे. पोक्सो केस. नं. ४४/२०१६) दाखल केले. दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी सरकारी पक्षातर्फे चारपेक्षा जास्त साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच सहायक सरकारी वकील सुहास सुलाखे यांचा युक्तीवादाचे अवलोकन करुन न्या. ए. एस. गांधी यांनी आरोपी अविनाश विलास जोगदंड यास दोषी धरुन कलम ३५४ (अ) भादंवि तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तसेच भादंवि कलम ४५२ अंतर्गत ३ वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुहास सुलाखे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून शिवाजी डोंगरे यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:51 IST
घरात घुसुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने अविनाश विलास जोगदंड यास ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.ए.एस. गांधी यांनी सुनावली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
ठळक मुद्देबीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : तीन वर्षांपूर्वी पेठ भागात घडला होता गुन्हा