शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:25 IST

बीडसह शेजारील जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात बीड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

ठळक मुद्देया टोळीत सात आरोपींचा समावेश असून, दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इतर पाच जणांचा शोध सुरु आहे.

बीड : बीडसह शेजारील जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीविरोधात बीड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीत सात आरोपींचा समावेश असून, दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इतर पाच जणांचा शोध सुरु आहे.

सौद्या आळकूट उर्फ व्यंकट पवार (रा. हिरडपुरी, ता. पैठण), सोमनाथ उर्फ सोम्या मदल्या भोसले (रा. खंडाळा, ता. पैठण) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. १२ फेब्रुवारी रोजी गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे बद्रीविशाल रामलाल निकम यांना गजाने व काठीने मारहाण करुन त्यांच्याजवळील ७० हजार ७०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला स.पो.नि. तडवी यांच्याकडे तपास दिला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एलसीबीचा अनुभव असलेल्या पो. नि. दिनेश आहेर यांच्याकडे सोपविला. त्यांनी स्था. गु. शा. व दरोडा प्रतिबंधक पथकाच्या सहाय्याने याप्रकरणाचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटकही केली. यासाठी त्यांना गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे स.पो.नि. श्रीकांत उबाळे यांनी मदत केली होती.

या गुन्हेगारी टोळीविरोधात दिनेश आहेर यांनी मोक्का प्रस्ताव तयार करुन २४ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला. जी. श्रीधर यांनी १ जून रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे प्रस्ताव सरकावला. ५ जून रोजी भारंबे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईची परवानगी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले हे करीत आहेत. उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दीड वर्षात ८ टोळ्यांवर मोक्काजानेवारी २०१७ पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ टोळ्यांतील ४० वर आरोपींवर मोक्का काद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये कोल्हापूरची आर्या गँग, आष्टीची पवार - भोसले गँग, बीडची आठवले गँग आदींचा समावेश आहे. याच कालावधीत १४ गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. ५४ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसRobberyदरोडाjailतुरुंगArrestअटक