शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात ‘जगताप-चाऊस’ वाद विकोपाला; राष्ट्रवादीत उभी फूट, ‘आधे इधर, आधे उधर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:51 IST

चाऊस गटाने स्वतंत्र गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटत नाही, तोच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) मोठी फूट पडली आहे. मोहन जगताप आणि सहाल चाऊस यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असून, १० नगरसेवकांच्या या गटात ‘आधे इधर, आधे उधर’ अशी अवस्था झाली आहे. चाऊस गटाने स्वतंत्र गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. सुरुवातीला इम्रान आगा खान यांची गटनेते म्हणून निवड झाली होती. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून ठिणगी पडली. मोहन जगताप यांचे समर्थक शरद यादव यांना सहाल चाऊस यांनी विरोध केला आणि थेट आमदार प्रकाश सोळंके (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करून उपाध्यक्षपद स्वतःच्या पदरात पाडून घेतले. तेव्हापासून जगताप आणि चाऊस यांच्यात विस्तवही जात नव्हता.

विषय समिती निवडीत पेचदोन दिवसांपूर्वी विषय समितीची निवड प्रक्रिया होणार होती. मात्र, गटनेत्यासह जगताप गटाच्या चार नगरसेवकांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. परिणामी, ही निवडप्रक्रिया पुढे ढकलावी लागली. गटनेता आपल्या बाजूने नसल्यास अडचण येऊ शकते, हे ओळखून सहाल चाऊस यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.

नव्या गटाची नोंदणीसहाल चाऊस यांनी अपक्षांना सोबत घेऊन नऊजणांचा नवीन गट तयार केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी लतिफ सय्यद हुर यांची निवड करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. या गटाला अधिकृत मान्यता मिळते की नाही, यावर आता नगरपालिकेचे भवितव्य अवलंबून आहे.

शहराच्या विकासाचा बळी?स्वतःच्याच पक्षातील नगरसेवकांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना विरोध होणार असल्याने, नगरपालिकेत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. यापूर्वीही माजलगावात नगरसेवकांच्या अंतर्गत वादात शहराचा विकास खुंटला होता, आता पुन्हा तीच पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Majalgaon NCP Split: Jagtap-Chaus Dispute Escalates, Party Divided

Web Summary : A major split occurred within Majalgaon's ruling NCP as the Jagtap-Chaus dispute intensified. Ten councilors divided, with the Chaus faction forming a separate group. This internal conflict threatens the city's development, raising concerns among residents.
टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेस