अंबाजोगाई : शहरात ढोर समाजाच्या स्मशानभूमीची झालेल्या अतिक्रमणांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. तसेच अंत्यविधीसाठी असणारे शेडही मोठ्या प्रमाणात उखडलेले असल्याने अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना समाजबांधवांना करावा लागत आहे.
अंबाजोगाई शहरातील हत्तीखाना परिसरात ढोर समाजाची स्वतंत्र स्मशानभूमी आहे. अंबाजोगाई शहरात ढोर समाजाची लोकसंख्या ७ हजारांपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या समाजासाठी एकमेव स्मशानभूमी या परिसरात आहे. या स्मशानभूमीच्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. जागेअभावी व बांधण्यात आलेल्या नादुरुस्त शेडमुळे अंत्यविधी हत्तीखाना परिसरातील असणाऱ्या लेणीच्या शेजारी केला जातो. तीन वर्षांपूर्वी आमदार निधीतून स्मशानभूमीसाठी छोटेसे शेड बांधण्यात आले आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने या शेडचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने शेडही मोडकळीस आले आहेत. या शेडचे छतही अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने छत कोसळतो की काय, यामुळे नागरिकही तिथे जाण्यास धजावत नाहीत. समाजातील मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार बाजूला केला जातो. अतिक्रमण व विविध कारणांमुळे ढोर समाजाच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अंत्यविधी करताना मयत व्यक्तीची व त्या परिवाराची मोठी कुचंबणा होत आहे. या संदर्भात तहसीलदार यांनी पुढाकाराने स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद खरटमोल यांनी केली आहे.
===Photopath===
090321\avinash mudegaonkar_img-20210309-wa0069_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई शहरात डोर समाजाच्या स्मशानभूमीची दूरवस्थ झाली असून प्रशासनाने लक्ष घालून प्रश्न मागर्पी लावण्याची मागणी होत आहे.