शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

घर लाखोंचे, दरवाजा हजाराचा अन् कुलूप केवळ १०० रूपयांचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:31 IST

लाखो रूपयांच्या टोलेजंग इमारती... आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सर्वत्र रंगीबेरंगी लेप... घरात ‘एसी’ अन् बसण्यासाठी महागडे सोफासेट.. असा सर्व लवाजमा करून समाजात ‘श्रीमंत व सुशिक्षित’ म्हणून वावरणारे नागरिकच आपल्या घराच्या सुरक्षिततेत गाफिल असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देचोरट्यांचा घरात सहज प्रवेश; काळजी घेण्यासंदर्भात आवाहन

बीड : लाखो रूपयांच्या टोलेजंग इमारती... आकर्षक दिसण्यासाठी त्यावर सर्वत्र रंगीबेरंगी लेप... घरात ‘एसी’ अन् बसण्यासाठी महागडे सोफासेट.. असा सर्व लवाजमा करून समाजात ‘श्रीमंत व सुशिक्षित’ म्हणून वावरणारे नागरिकच आपल्या घराच्या सुरक्षिततेत गाफिल असल्याचे समोर आले आहे.

लाखोंच्या इमारतीला केवळ तीन ते पाच हजाराचा लाकडी दरवाजा, ५०० रूपयांचा किरकोळ कोंडा अन् त्याला १०० रूपयांचे कुलूप लावून ते बाहेर जातात. त्यामुळे चोरट्यांना कुठलेही परिश्रम न घेता चोरी करणे शक्य होत असल्याचे रविवारी रात्री बीड शहरात झालेल्या सर्व चोऱ्यांवरून दिसते. या सर्व चोºया कुलूप व कोंडा तोडून झाल्या आहेत.

बीड शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बीड शहरात चार तर माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावमध्ये दोन घरफोड्या झाल्या. यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यसानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंंचनामा केला. बीडमधील चारही चोºया घराचा कोंडा व कुलूप तोडून झाल्याचे दिसून आले. या सर्व चोºया गजबजलेल्या टोलेजंग इमारतीत झाल्या आहेत. या चोºया एकाच टोळीने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैदही झाले होते.

दरम्यान, चोºया रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त, जनजागृती केली जात आहे. परंतु तरीही चोºया घडत राहिल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. एकीकडे चोरटे जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहेत. परंतु नागरिकांनी मात्र पोलिसांवर आरोपांच्या फैरी झाडून हात वर केले आहेत. असे असले तरी नागरिक किती सजग आहेत, याचा आढावा घेतला असता सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे.

सारडा नगरीत किरायाचे घर करून राहणारे व्यवसायीक हे आपल्या पत्नीसह राखी पोर्णिमेसाठी गावी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कोंडा तोडून प्रवेश करीत घरातील २६ हजार रूपये रोख व इतर दागिने लंपास केले. सकाळी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी किरकोळ असलेला कोंडा तोडून आत प्रवेश केला. तर मास्टर की, ने कपाट उघडून त्यातील ऐवज लंपास केला. सकाळी शेजारच्यांना घर उघडे दिसले तरी त्यांनी याबाबत काहीच विचारपूस केली नाही.

दुपारी १२ वाजता पोलिसांनी सांगितल्यावर शेजारच्यांना हा प्रकार समजला. यावरून शहरातील परिस्थिती समोर येते. परंतु हे टाळण्यासाठी नागरिकांनी दर्जेदार दरवाजे, मजबूत कोंडे आणि कुलूप बसविण्याची गरज आहे. तसेच बाहेर जाताना खिडक्या बंद कराव्यात. घरात प्रवेशासाठी जागा राहणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.पुढाकार : परिसरात सीसीटीव्ही बसवावेतमोठ्या अपार्टमेंट, गल्ली, चौक आदी ठिकाणी परिसरातील लोकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. तसेच शक्य असल्यास पहारेकरीही ठेवणे आवश्यक आहे.कॅमेºयांमुळे गैरप्रकारांना तर आळा बसेलच शिवाय किमान घटना घडल्यावर तरी त्यावर तपास करण्यासाठी कॅमे-याीच मदत होईल. याबाबत पोलिसांनी वारंवार बैठका घेतल्या, परंतु याची कोणीच दखल घेतली नाही. चोरी झाल्यावर हा मुद्दा पुन्हा समोर येतो.पोलिसांकडून आवाहननागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पोलिसांकडून तर गस्त सुरूच आहे, परंतु आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून उपाययोजना व काळजी घेणे गरजेचे आहे. झालेल्या चोºयांचा तपास सुरू आहे.

लवकरच चोरटे गजाआड करू, तसेच यापुढे चोºया होणार नाहीत, यासाठी गस्त वाढविण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु नागरिकांनी सजग रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके, सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधकचे प्रमुख सपोनि गजानन जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडThiefचोरMarathwadaमराठवाडा