शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पुरुषांची नस मोकळी; महिलांच्या खांद्यावरच ‘कुटुंब कल्याण’चे ओझे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 09:46 IST

पुरुषांचे प्रमाण केवळ अडीच टक्के : कोरोना काळात घटल्या शस्त्रक्रिया

सोमनाथ खताळ  बीड : छोटे कुटुंब, सुखी कुटुंबासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु याची सर्व जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर असल्याचे समोर आले आहे. राज्यात ९७ टक्के महिला कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया करीत असून, नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण अवघे अडीच टक्के आहे. कोरोना काळात अशा शस्त्रक्रिया निम्म्याने घटल्या आहेत.       

माता व बालमृत्यू थांबावेत, यासाठी आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविणे सुरू केले. महिलांची शस्त्रक्रिया तर पुरुषांची नसबंदी करून छोटे कुटुंब संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु यासाठी पुरुष नकारात्मक असल्याचे समोर आले आहे. मागील पाच वर्षांतील राज्याची माहिती घेतली असता, केवळ अडीच टक्के पुरुषांनी नसबंदी केली आहे. तर महिलांचा आकडा हा ९७ टक्के एवढा आहे. मागील आठवड्यात पुण्यात संचालकांच्या उपस्थितीत राज्यातील माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांसह बाह्य निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता.  

शस्त्रक्रियांची आकडेवारी अशीराज्यात २०१७-१८ साली ४ लाख २१ हजार ५०९ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तर कोरोना काळात म्हणजेच २०१९-२० मध्ये ३ लाख ७१ हजार व २०२०-२१ मध्ये २ लाख ११ हजार ७७३ शस्त्रक्रिया झाल्या. २०२१-२२ मध्ये २ लाख ८० हजार ७७९ एवढ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.  

गर्भनिरोधक गोळ्यांचाही वापरजनजागृती आणि उपाययोजनांमुळे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरही वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी २ लाख ४२ हजार लोकांनी ही गोळी खाल्ली होती. कोरोनात आकडा २ लाख २७ हजारावर गेला होता; परंतु गतवर्षी त्यात वाढ होऊन २ लाख ४६ हजार इतक्यावर तो पोहोचला आहे.  

निरोधच्या वापरातही घट   २०१७-१८ साली ३ लाख ६ हजार १८७ लोकांनी निरोध वापरले होते. कोरोना काळात २०२०-२१ मध्ये २ लाख २९ हजार ९३२ एवढी संख्या होती. आता पुन्हा संख्या वाढू लागली आहे. गतवर्षात पावणे तीन लाख लोकांनी निरोधचा वापर केला आहे.  

टॅग्स :Womenमहिलाwomen and child developmentमहिला आणि बालविकासFamilyपरिवार