राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:56 PM2019-10-13T23:56:58+5:302019-10-13T23:58:20+5:30

माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ पवार यांनी वज्रमूठ आवळली.

Meetings of Nation 1 Vadi Congress workers, office bearers | राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका

राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका

Next
ठळक मुद्देप्रकाश सोळंके समर्थकांचे एकमत : विकासासाठी प्रकाशदादांसोबत राहण्याचा वडवणीत निर्धार

वडवणी : गेल्या पाच वर्षांपासून जनतेने मतदार संघाबाहेरील उमेदवाराला लोकप्रतिनिधीत्व दिले. मात्र त्यांनी विकासाकडे पाठ फिरविली. बाहेरच्या मतदार संघातून येणा-या उमेदवारांना स्थानिक प्रश्नांची जाण व विकासकामाचे देणंघेणं नसते, याचा अनुभव जनतेला आला आहे. त्यामुळे आता माजलगाव मतदार संघातील विकास योजनांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशदादा सोंळके यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करत येथील नगरसेवक सुधीर ढोले, विनोदकुमार नहार, संभाजी शिंदे, माजी जि. प. सदस्य सर्जेराव आळणे, माजी सरपंच भिमराव उजगरे, गंपूशेठ पवार यांनी वज्रमूठ आवळली.
मागील पाच वर्षात खुंटलेला विकास पुन्हा जोमाने करण्यासाठी शहरातील विखुरलेल्या नेते मंडळींची मोट बांधण्यात प्रकाश सोळंके अखेर यशस्वी ठरले. शुक्रवारी समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोळंके यांनी त्यांच्या कार्यकाळातील पंधरा वर्षातील विविध विकास कामांचा आलेख मांडला. उर्वरित विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार पाठपुरावा देखील करू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सोळंके म्हणाले, माजलगाव विधानसभा निवडणुकीत वडवणी तालुक्यातील मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरत असते. अत्याधुनिक एमआयडीसी, बस स्थानक, वडवणीच्या बाजूने रिंग रोड, व्यायामशाळा, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार, मंजूर ग्रामीण रूग्णालय उभारणीचे काम करणार असल्याचे सोळंके म्हणाले.
यावेळी माजी सभापती सुधीर ढोले, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ मेत्रे, जिल्हा परिषद सर्जेराव आळणे, संभाजी शिंदे, गंपू पवार, भीमराव उजगरे, वडवणी शहराध्यक्ष विठ्ठल भुजबळ, भानुदास उजगरे, अंकुशराव शिंदे, गुलाब राऊत, संतोष पवार, बाळासाहेब नागरगोजे, बुवासाहेब शिंदे, डॉ. खान, नगरसेवक विनोदकुमार नहार, श्रीराम मुंडे, विश्वास आसलकरसह सोळंके यांना मानणारे मतदार उपस्थित होते.

Web Title: Meetings of Nation 1 Vadi Congress workers, office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.